गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

डिकसळमधला मोर कोणी मारला?

घात की अपघात? वनविभाग बेफिकीर

Spread the love

सांगोला/डॉ.नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील फॉरेस्ट गट नंबर 222 मधील 42 हेक्टरमध्ये एक मोर मृतावस्थेत आढळून आला आहे. घटनास्थळी मोराचे पाय, बरगड्या आणि पिसे सापडली आहेत. मोराची हत्या की घातपात?अशी चर्चा सुरू आहे. ही घटना स्थानिकांनी वनविभागाला सांगूनही त्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. सदर घटनास्थळी दुपारी वन परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे, वनपाल वाघमोडे यांनी भेट देवून पंचनामा केला आहे. त्यानंतर त्या मोराच्या अवशेषला जागेवरच अग्नी देण्यात आला. सदरच्या मोर हा रानटी प्राण्याच्या हल्ल्यात झाला असावा, असे वन परिक्षेत्र अधिकारी भाटे यांनी सांगितले.

सदरची घटना बुधवारी घडली असावी, असा कंत्राटी वनमजुरांचा दावा आहे. सध्या त्याठिकाणी सांगाडा आणि पंख पडले आहेत.

येथेच मोर मृतावस्थेत आढळला

सांगोला तालुक्यातील डिकसळ येथे वनविभागाचे 340 हेक्टर इतके क्षेत्र आहे. यामध्ये वन्यप्राणी तसेच पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. गावाच्या चोहोबाजूंनी हे क्षेत्र आहे. मोर मृतावस्थेत आढळण्याची घटना गंभीर स्वरूपाची आहे. तरीही वनविभागाने ही घटना गांभीर्याने घेतली नाही.

याबाबत माहिती अशी की, डिकसळ हद्दीतील फॉरेस्ट गट 47 मध्ये मोठ्या प्रमाणात प्राणी व पक्षी आहेत. ही मोर मरण्याची घटना काल घडली आहे. असे येथील मेंढपाळानी सांगितली. मोर अज्ञाताने मारला की त्याचा घातपात झाला हे अद्याप समजू शकले नाही.

मोराच्या अवशेषला जागेवरच अग्नी देण्यात आला.

सध्या या ठिकाणी मोराचा सांगाडा आणि पंख बऱ्याच ठिकाणी विस्कटलेले आहेत. यामध्ये त्याचे दोन्ही पाय ही पहावयास मिळत आहेत. सध्या उन्हाळा तोंडावर आहे. याच डिकसळ गावात 340 हेक्टर क्षेत्र असून, वनविभागाने वन्य जीवांसाठी कोणत्याच प्रकारे पाण्याची सोईसुविधा केली नाही. जर हीच वनक्षेत्रे कोणीच राखत नसेल तर हे प्राणी राहतील का? यासाठी स्वतंत्र वनविभाग आहे. पण कोणीच याकडे लक्ष देत नाही.

ही मोर मारण्याची घटना मोठी असूनही याबाबत कल्पना दिली तरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मला मीटिंग आहे, असे कारण सांगून दुर्लक्ष केले. ज्याठिकाणी घटना घडली, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही झालेली आहे.

मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. प्रजासत्ताकदिनीच डिकसळ गावात फॉरेस्ट गट नंबर 47 मध्ये एका मोराचा घातपात झाला आहे. ही सदरची घटना काल घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत मोराचे अवशेष पहावयास मिळत आहेत. मोराचे अवशेष असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असल्याचे पहावयास मिळाले. तोडलेल्या लाकडांचा ठीग ही त्याच ठिकाणी होता.

ही सदरची घटना 25 जानेवारी 2023 रोजी घडलेली असावी असे दिसते. ही घटना आज प्रजासत्ताक दिनी उघडकीस आलेली आहे. 10 वाजलेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत कोणीच एकडे फिरकले नाहीत.याविभागाला कोणतेच गांभीर्य नाही, असे एकूण परिस्थितीवरून दिसते.

सदर घटनास्थळी दुपारी वन परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे, वनपाल वाघमोडे यांनी भेट देवून पंचनामा केला आहे. त्यानंतर त्या मोराच्या अवशेशाचे जागेवरच अग्नी देण्यात आला. सदरच्या मोर हा रानटी प्राण्याच्या हल्ल्यात झाला असावा, असे वन परिक्षेत्र अधिकारी भाटे यांनी सांगितले.

डिकसळ गावामध्ये मोरांची संख्या 150 ते 200 इतकी आहे. सशांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यांची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याचा संशय स्थानिक लोक व्यक्त करतात. वण्यसंपदा, वन्य जीव जोपासण्याची सरकारी जबाबदारी अधिकाऱ्यांवर असताना ते ही जबाबदारी नीटपणे पार पाडताना दिसत नाहीत. प्राणी, पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.


हेही वाचा

संविधानाने आपल्याला काय दिले?

जवळ्यातील ‘भारत’च्या कार्याला सलाम

सोलापूरचे 4 तरुण तिरुपती येथे कार अपघातात ठार

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका