डाॅ. मानसी पवार यांनी पुण्यात दिला अनेक कुटुंबांना मदतीचा आधार
जम्मू काश्मीरसह महाराष्ट्राच्या विविध भागात पोहचवली मदत
अशोक कांबळे (विशेष प्रतिनिधी) – कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते.टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आले.त्यामुळे अनेक लोकांचे रोजगार जावून अनेक कुटुंबांच्या आर्थिक समस्येसह जेवणाच्या समस्येत वाढ झाली होती.लॉकडाऊन झाल्यापासून पुण्यातील औंध परिसरातील डाॅ. मानसी पवार यांनी अनेक कुटुंबाना मदतीचा आधार दिला असून गेल्या आठ महिन्यांपासून पुण्यातील विविध भागात धान्य, औषधे, किराणा माल, कपडे यासह इतर मदत गरजू कुटुंबापर्यंत पोहचवण्याचे काम डाॅ.मानसी पवार अविरतपणे करत आहेत. त्यांनी जम्मू काश्मीर येथेही लोकांना आर्थिक मदतीसह धान्य पोहचवण्याचे काम केले आहे.
डाॅ.मानसी पवार या फिजीओथेरफिस्ट असून गेल्या अकरा वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.लॉकडाऊनच्या काळात कोरोनापासून बचावाची योग्य काळजी घेत त्यांनी अनेक फॅक्चर झालेल्या रूग्णांच्या घरी जावून अल्प दरात वैद्यकीय सेवा दिली आहे.कोरोनाच्या काळात अनेक डाॅक्टरांनी वैद्यकीय सेवा देण्यास नकार दिला होता.पण डाॅ.मानसी पवार यांनी वैद्यकीय सेवा अविरतपणे चालू ठेवली आहे.वैद्यकीय सेवेसह त्यांनी पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागात धान्यसह इतर मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.
पुण्यातील गुरूवार पेठ,कसबा पेठ,रविवार पेठ,शुक्रवार पेठ,औंध बाणेर,पाषाण,खडकी पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी यासह पुण्याच्या विविध भागात गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली आहे.आजारी असलेल्या रूग्णांना पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देणे.अँब्यूलन्स मिळून देणे.रूग्णांना औषधे उपलब्ध करून देणे अशी वेगवेगळ्या प्रकारची मदत डाॅ.मानसी पवार करत आहेत.
लॉकडाऊनमुळे यात्रा,जत्रा यांच्यावर बंदी आल्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती.कलाकारांचा डाॅ.मानसी पवार यांच्याशी संपर्क आल्याने मानसी पवार यांनी कलाकारांना धान्य उपलब्ध करून देवून कलाकारांच्या जेवणाचा प्रश्न मिटवला.
आजही डाॅ.मानसी पवार पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागात मदत पोहचवण्याचे काम करत आहेत.
जम्मू काश्मीर येथे मागील वर्षी गेले होते.त्यामुळे तेथील लोकांच्या समस्या जाणून घेवून तेथे काम करण्यास सुरूवात केली. जम्मू काश्मीर येथील एक रूग्ण एका संस्थेच्या माध्यमातून उपचासाठी आला होता.त्यामुळे तेथील एक कुटुंब चांगल्या परिचयाचे झाले आहे.त्यामुळे तेथे चांगले काम करता आले.लॉकडाऊनच्या काळात जम्मू काश्मीर येथून अनेक लोकांनी मदत मागितली.तेथील प्रशासनाशी संपर्क साधून लोकांना मदत उपलब्ध करून देण्याचे काम केले.धान्य,कपडे,रहाण्याची समस्या यासह अनेक समस्या सोडवता आल्या. तसेच काही कुटुंबांना आर्थिक मदतही दिली.आजही लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचे काम अविरतपणे सुरू आहे.
डाॅ.मानसी पवार,फिजीओथेरफिस्ट औंध,पुणे