डाळिंबाच्या सेंद्रिय शेतीतून पिकवलं सोनं!
तीन हजार झाडांमध्ये 50 टन डाळिंबाचे उत्पन्न अपेक्षित
खानजोडवाडीतील शेतकऱ्यांनी युरोपमध्ये डाळिंबाची मोठी निर्यात केली आहे. किटनाशकांचा अंशापासून मुक्त अशी दर्जेदार डाळिंब लागवडीत इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. खानजोडवाडीतील शेतकऱ्यांनी पाणी आणि शेतीच्या योग्य नियोजनाच्या जोरावर डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत.
अजनाळे : सचिन धांडोरे
शेतकऱ्यांना जर भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल आणि त्यांना जर पैसै कमवायचे असतील तर ऊस, सोयाबीन, कापसाकडे पाहिले जाते. पण आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी गाव त्याला अपवाद आहे. येथील शेतकऱ्यांनी डाळिंब उत्पादनात खुपच प्रगती केली असून हणमंत मगर या प्रगतशील शेतकऱ्यांने जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिकच्या सेंद्रिय खतांचा वापर करून डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत. यंदा त्यांना तीन हजार झाडांमध्ये 50 टन निर्यातक्षम डाळिंब अपेक्षित असून 60 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असे त्यांनी सांगितले.
किटनाशकापासून मुक्त
सांगली जिल्ह्यातील आटपाडीचा परिसर कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणावरच आपली शेती करावी लागते. त्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळंही इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. खानजोडवाडीतील शेतकऱ्यांनी युरोपमध्ये डाळिंबाची मोठी निर्यात केली आहे. किटनाशकांचा अंशापासून मुक्त अशी दर्जेदार डाळिंब लागवडीत इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. खानजोडवाडीतील शेतकऱ्यांनी पाणी आणि शेतीच्या योग्य नियोजनाच्या जोरावर डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत.
निर्यातक्षम डाळिंब
प्रगतशील शेतकरी हणमंत मगर यांनी शेतीचे योग्य नियोजनामुळे अवकाळी पावसाचा फटका फारसा बसला नाही. त्यामुळे या शेतकऱ्याने यंदाही निर्यातक्षम डाळिंब पिकवली आहेत. त्यांनी जवळपास साडे तीन हजार डाळिंबाची झाडे जोपासली असून गेल्या तीन वर्षांपासून ते डाळिंब बागेसाठी जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिकची खते, औषधांचा वापर करत आहेत.
50 टन उत्पन्न अपेक्षित
खानजोडवाडी गावातील हणमंत मगर या शेतकऱ्याने डाळिंब उत्पादनात मोठं नाव कमावलं आहे. सततचा दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा आणि तेल्या, बिब्यासारख्या किडीचा सामना करत त्यांनी डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. विषमुक्त डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीची खते, औषधांचा वापर केल्याने तीन हजार झाडांना मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली असल्याने 50 टन उत्पन्न अपेक्षित आहे.
सध्या डाळिंब, द्राक्ष, पेरू, सीताफळ यासह इतर फळबागा व पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी सेंद्रिय खतांची आवश्यकता आहे. सेंद्रीय खतांचा वापर केल्याने विषमुक्त फळ बाजारपेठेत उपलब्ध होत असल्याने जास्त दर मिळत आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीतून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे कल वाढला आहे.