Think Tank News Network
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पडझड थांबायचे नाव घेत नाही अशी स्थिती आहे. 40 आमदारांनी बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यानंतरही शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होत आहेत. आत्ता कुठेही स्थिती शांत होईल असे वाटत असताना आज शुक्रवारी शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनीही शिवसेने सोबतची उरलीसुरली साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. आधीच खिंडार पडलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला खासदार कीर्तिकर यांच्यामुळे खूप मोठे भगदाड पडले आहे.
ठाकरे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांचा अखेर शिंदे गटात प्रवेश झाला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या जामीनानंतर शिवसेनेच्या गोटात कमालीचे आनंदाचे वातावरण आहे. शिवसेना पक्षाकडून एकीकडे आनंद, जल्लोष साजरा केला जात असतानाच खासदार गजानन कीर्तिकर हे अचानक शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यामुळे खासदार राऊत यांच्या जामीनाच्या जल्लोषाचे रूपांतर जणू सुतक पडल्याच्या स्थितीत झाले आहे.
गजानन कीर्तिकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतीने अनेक वर्षे राजकारण केलेले वरिष्ठ नेते आहेत. खासदार कीर्तीकर यांना मानणारा मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार व काही खासदार त्यांच्या गटात गेले. मात्र उरलेल्या सर्व लोकांनी अर्थात आमदार व खासदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत साथ देण्याचे अभिवचन दिले होते. मात्र एक एक करत यातीलही काहीजण फुटले. मागील वीसेक दिवसात ठाकरे गटातून शिंदे गटात गेल्याची कुठलीही बातमी आली नव्हती.
आता जे उरले आहेत ते सर्व उद्धव ठाकरे यांचे सोबती आहेत असे मानले जात असतानाच खासदार गजानन कीर्तिकर यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबरी धक्का दिला आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासोबत आणखी किती पदाधिकारी नेते कार्यकर्ते जाणार याचीही उत्सुकता आहे.
“घे चुना.. मळ पुन्हा” गायछाप गुजरातेत गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही