स्पेशल रिपोर्ट / नाना हालंगडे
भारत सरकारने जेनेरिक औषधे ‘जनऔषधी’ या नावाने सर्वसामान्य जनतेसाठी नोव्हेंबर २००८ पासून उपलब्ध करून दिली आहेत. राज्याराज्यात जनऔषधी दुकाने उघडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आजमितीस विविध स्वरुपाची विविध रोगांवरील ३६१ जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार डॉक्टर्स जर रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून द्यायला लागले, तर विकसित देशांमध्ये आरोग्य खर्च ७०% ने आणि विकसनशील देशांमध्ये त्याहूनही कमी होऊ शकतो.
जेनेरिक औषधे बाजाराच्या इतर औषधांच्या तुलनेत १० ते १२ टक्केच विकली जातात. जेनेरिक औषधांमुळे मिळणारा कमी नफा आणि कमिशन यांमुळे औषध कंपन्या, मेडिकल स्टोर आणि डॉक्टर यांपैकी कोणालाच जेनेरिक औषधांची मागणी वाढावी असे वाटत नाही. आज बाजारात जवळपास सर्व प्रकारची जेनेरिक औषधे उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ब्रँडेड औषधांपेक्षा खूप कमी असून गरीब माणूस देखील सहज ही औषधे विकत घेऊ शकतो.
जेनेरिक औषधे कशाला म्हणतात?
जेनेरिक औषधांना इंटरनॅशनल नॉन प्रॉपराइट नेम मेडिसन देखील म्हटले जाते, ज्यांची निर्मिती ब्रँडेड औषधांसारखीच होते. त्याचबरोबर ही औषधे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एसेंशियल ड्रगलिस्टमध्ये सांगितलेल्या वैशिष्ट्यांशी अनुरूप असतात. ज्याप्रमाणे ब्रँडेड औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे जेनेरिक औषधांच्या विक्री आणि खरेदीसाठी देखील परवाना आणि परवानगी घ्यावी लागते. ब्रँडेड औषधांसारखीच जेनेरिक औषधांची देखील गुणवत्ता तपासली जाते.
एखाद्या आजाराच्या उपचारासाठी रिसर्च आणि स्टडी केल्यानंतर एक रसायन (साल्ट) बनवले जाते, जे सहजरीत्या उपलब्ध करण्यासाठी त्यांना औषधांचे रूप दिले जाते. ह्या औषधांना प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या नावाने विकते. काही कंपन्या महाग किंमतीत विकतात तर काही कंपन्या स्वस्त दरात विकतात.
‘जेनेरिक औषधे’ म्हणजे ब्रॅँडेड नसलेली स्वस्त पण दर्जेदार औषधे. जेनेरिक औषध व त्याचे ब्रॅण्डेड औषध यात खालील साधम्र्य असते. मुख्य घटक पदार्थ शरीरात शोषले जाण्याचा वेग आणि रक्तातली पातळी औषधाचे डोसेज फॉर्म (उदा. टॅब्लेट, कॅप्सूल, सिरप)
जेनेरिक औषधे स्वस्त का असतात?
ब्रँडेड औषधांची किंमत कंपन्या स्वतः ठरवतात. पण या कंपन्या जेनेरिक औषधांची किंमत कशीही ठरवू शकत नाही. जेनेरिक औषधांची किंमत सरकारच्या हस्तक्षेपाने ठरवली जाते. तुमचा डॉक्टर जे औषधे लिहून देतो त्याच स्लॉटमधील जेनेरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध असतात, महाग औषधे आणि त्याच स्लॉटमधील जेनेरिक औषधे यांच्या किंमतीमध्ये कमीत कमी पाच ते दहापट अंतर असते. काहीवेळा तर जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधे यांच्यातील किंमतीमध्ये ९०% फरक असतो.
ब्रॅण्डेड औषधाच्या तुलनेत जेनेरिक औषधात मुख्य घटक पदार्थ सोडल्यास अन्य घटक पदार्थ, रंग वगैरे भिन्न असू शकतात, त्यामुळे पेशंटने जेनेरिक औषध सुरू केल्यावर खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.
- कुठल्याही स्वरुपाची अॅलर्जी
- औषधाचे अन्य दुष्परिणाम
- औषधाच्या प्रभावीपणात काही फरक जाणवतो का?
जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना वेगळ्या संशोधन आणि विकासासाठी प्रयोगशाळा बनवण्याची आवश्यकता नसते, हे देखील कारण आहे की जेनेरिक औषधे बनवणाऱ्यांमध्ये स्पर्धा होते. त्या कारणाने सुद्धा किंमत कमी होते. आणि सर्वात मोठे कारण हे आहे की, जेनेरिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या आपल्या या औषधांची जाहिरात करत नाहीत. त्यामुळे ह्या औषधांना लागणारा खर्च कमी होतो आणि लोकांसाठी स्वस्त दरात ही औषधे उपलब्ध होतात.
दर्जा उपयुक्तत औषधाची मात्रा कोणतेही ब्रॅण्डेड औषध बाजारात आणण्यापूर्वी मूळ कंपनीने त्या औषधावरील संशोधन, प्राणी आणि मानवावर औषधाच्या चाचण्या यासाठी बराच कालावधी व पैसा खर्च केलेला असतो. जेनेरिक औषध हे त्याच्या ब्रॅण्डेड औषधाची प्रतिकृती असल्यामुळे उत्पादकाला संशोधन, विविध प्रकारच्या चाचण्या असा कोणताही खर्च करावा लागत नाही आणि म्हणूनच जेनेरिक औषध अतिशय किफायतशीर दरात सहज उपलब्ध करून देणे शक्य होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जेनेरिक औषधांची गुणवत्ता ब्रँडेड औषधांपेक्षा बिलकुल कमी नसते आणि त्यांचा होणारा परिणाम सुद्धा ब्रँडेड औषधांपेक्षा कमी नसतो. जेनेरिक औषधांचा डोस आणि त्यांचे साइड-इफेक्ट काही प्रमाणात ब्रँडेड औषधांसारखेच असतात. (The quality of international standard generic drugs is not inferior to the branded drugs and their effect is also not inferior to the branded drugs. The dosage and side-effects of generic drugs are somewhat similar to those of branded drugs.)
या आजारांची जेनेरिक औषधे स्वस्त असतात
काहीवेळा डॉक्टर फक्त साल्टचे नाव लिहून देतात, तर कधी कधी फक्त ब्रँडेड औषधांचे नाव लिहून देतात. काही खास आजार आहेत ज्यांची जेनेरिक औषधे उपलब्ध असतात परंतु त्याच साल्टची ब्रँडेड औषधे महाग असतात. जसे न्युरोलोजी, युरीन, हार्ट डिजीस, किडनी, डायबिटीज, बर्न प्रोब्लेम, या आजारांच्या जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांच्या किंमतीमध्ये खूप जास्त अंतर दिसून येते एकाच स्लाटच्या दोन औषधांच्या किंमतीमधील मोठा फरकच जेनेरिक औषधांचा पुरावा आहे.
जेनेरिक औषधे कशी प्राप्त करू शकता?
जेव्हा कधी डॉक्टरकडे जाल तेव्हा त्या डॉक्टरला जेनेरिक औषधे लिहून देण्यास सांगा आणि मेडिकल स्टोर्सवर सुद्धा जेनेरिक औषधांची मागणी करा. तसेच ही औषधे Healthkart Plus आणि Pharma Jan Samadhan यांसारख्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्ही सहज स्वस्तात मिळवू शकता. यासाठी सरकारने कायदा करून त्याचा सक्तीने पालन करण्यास डॉक्टरांना सांगितले पाहिजे म्हणजे डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देतील आणि मेडिकल स्टोर्सवाले काही कारण न सांगता ती औषधे लोकांना सहज उपलब्ध करून देतील.
सरकारची ‘kjanaushadhi.gov.in’ ही वेबसाईट आहे त्यावर आपल्याला उपलब्ध जेनेरिक औषधांची यादी, किंमत, ब्रॅण्डेड औषधांचा जेनेरिक ‘पर्याय’, दुकानांची पत्त्यासह माहिती, माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी हेल्पलाईन अशी उपयुक्त माहिती दिलेली आहे.
जेनेरिक औषधांविषयी हेल्पलाईन :
१८००-१८०-८०८० काळाची गरज बनलेल्या औषधांसाठी ‘जेनेरिक औषधे’ हा एक योग्य सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.
हेही वाचा