जुळ्या बहिणींनी केला एकाच तरुणासोबत विवाह
सोलापूर जिल्ह्यातील घटना, व्हिडिओ व्हायरल
थिंक टँक / नाना हालंगडे
हल्ली लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले असताना सोलापूर जिल्ह्यातील एका गावात चक्क दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत विवाह केला. या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
त्याचे झाले असे.
पिंकी आणि रिंकी या दोघीही त्यांच्या कुटुंबियांसह कांदिवलीत राहतात. उच्च शिक्षण घेतलेल्या या तरुणींनी अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल एजन्सी असणाऱ्या तरुणाशी लग्न केलंय. सहा महिन्यांपूर्वीच दोन्ही जुळ्या बहिणींची अतुलसोबत ओळख झाली होती. जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी केलेल्या या आगळ्या वेगळ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या विवाहाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
विवाह सोहळ्याचा व्हिडिओ बातमीच्या शेवटी आहे.. लिंकवर क्लिक करून पाहा
या दोन्ही जुळ्या बहिणी कांदिवलीतील असून त्यांनी टॅक्सी ट्रॅव्हलची एजन्सी असलेल्या तरुणाशी विवाह केलाय. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोन्ही जुळ्या बहिणींचे एकाच तरुणावर प्रेम जडले. त्यानंतर नातेवाईकांच्या परवानगीने दोघींनी त्याच्याशी एकाच मांडवात लग्न केलं आहे.
सहा महिन्यांपूर्वी पिंकी आणि रिंकीची आई आजारी पडली होती. उपचारासाठी पिंकी, रिंकीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा अतुलने त्यांच्या आईची रुग्णालयात काळजी घेतली होती. रुग्णालयात आईची काळजी घेणाऱ्या तरुणाच्या या प्रेमात दोन्ही जुळ्या बहिणी पडल्या. यानंतर दोघींनीही नातेवाईकांच्या संमतीने अतुलसोबत माळशिरसमध्ये एकाच मांडवात लग्न केलं.