सांगोला/नाना हालंगडे
वारकऱ्यांच्या पायी दिंडीत भरधाव कार घुसल्याने सातजण जागीच तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सांगोला तालुक्यातील जुनोनी बायपास येथे घडला आहे. सोलापूर – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्री सातच्या सुमारास घडला आहे. अपघातातील सर्व मृत हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील आहेत.
मृतांमध्ये पाच महिला, एक पुरुष, एक लहान मुलगा यांचा समावेश आहे.
मृत वारकऱ्यांची नावे
शारदा आनंदा घोडके
सुशीला पवार
रंजना बळवंत जाधव
गौरव पवार
सर्जेराव जाधव
सुनिता सुभाष काटे
शांताबाई शिवाजी जाधव
हे सर्वजण राहणार करवीर तालुक्यातील आहेत.
थिंक टँकच्या बातम्या पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ही दिंडी होती. जुनोनी गावाजवळील श्रीराम वस्ती येथेबी दिंडीचा मुक्काम होता. जिथे अपघात झाला तेथून ही वस्ती दोन किमी होती.
एम एच १३ डी ई ७९३८ या क्रमांकाची कार दिंडीत घुसली. कार्तिकी एकादशी वारीसाठी हे वारकरी पंढरपूरला निघाले होते. कोरोना महामारीनंतर यंदा प्रथमच कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गर्दी सर्वत्र दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ही भाविकांची दिंडी जुनोनी सांगोलामार्गे पंढरपूरला निघाली होती. आज सायंकाळी सहाच्या सुमारास या दिंडीने सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला.
सातच्या सुमारास सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळील बायपास रस्त्यावर ही दिंडी आले असता भडगाव वेगात कोल्हापूरहून सोलापूरकडे निघालेल्या कारने वारकऱ्यांना धडक दिली. या धडकेत सात भाविक जागीच ठार झाले आहेत. ती कार वारकऱ्यांच्या गर्दीत घुस्तच सर्वत्र आक्रोश आणि किंचाळण्याचा आवाज आला. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.
ही घटना समजतात सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. आज झालेल्या या अपघातामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.