जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची कोळा येथील अस्थिविहारास सदिच्छा भेट
नियोजित अस्थिविहार कामाची केली पाहणी
सांगोला/ डॉ. नाना हालंगडे
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोळा, ता. सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहारास सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तहसीलदार अभिजित पाटील, सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे, जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. अस्थी विहार भेटीनंतर कोळे येथे सुरु असलेल्या अस्थिविहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी त्यांनी केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेऊन त्यांनी सुरु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. व सदर कामास कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मा. पोलिस पाटील शंकर मोरे यांनी अस्थिविहार आणि सुरु असलेल्या कामाबाबत माहिती दिली. यावेळी जेष्ठ नेते रंगनाथ मोरे, चंद्रकांत मोरे सर, ग्रा. सदस्य विनोद काटे, अझर खाटिक, समाधान इमडे, धनंजय काटे, डॉ. नितीन काटे यांच्यासह कोळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- हेही वाचा : ग्रामसभेत मतदारयादीचे वाचन होणार