जामखेडचा धम्मरत्न जावळे बनला युनेस्कोचा जागतिक युवादूत
जावळे यांनी WHO सोबतही केले आहे काम
सोलापूर/अशोक कांबळे : युनेस्कोच्या ग्लोबल अलायन्स फॉर पार्टनरशिप ऑन मिडीया अँन्ड इन्फॉर्मेशन लिटरसी (GAPMIL) कडून जगाच्या विविध भागात युनेस्कोच्या माध्यम आणि माहिती साक्षरतेच्या जागतिक कृती आराखड्यावर काम करण्यासाठी जगभरातून 12 युवादूतांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील धम्मरत्न जावळे यांची निवड युनेस्कोच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
धम्मरत्न जावळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागात पीएच.डी. करत आहेत. त्यांची आशिया पॅसिफिक प्रदेशासाठी युनेस्कोच्या गॅपमिलचे जागतिक युवादूत म्हणून निवड झाली आहे.
धम्मरत्न जावळे यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेत झाले असून अकरावी, बारावी, बीएससी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून झाले आहे.मिडीया कम्युनिकेशन्स (M.SC) पुणे विद्यापीठातून झाले असून ते सेट, नेट परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते पुणे विद्यापीठात पीएच.डी. करत आहेत. युनेस्कोने जावळे यांच्या सोबत उत्तर अमेरिका,आफ्रिका, लॅटिन अमेरिका, अरब राज्ये कॅरिबियन देशातील अन्य युवा दूतांचीही निवड केलेली आहे. सर्व युवादूत गॅपमिलच्या जातिक युवक समितीचे 2019-2021 या कालावधीसाठी सदस्य म्हणून आपापल्या विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
नायजेरिया या देशातील अबूजा येथे 2013 साली झालेल्या ग्लोबल पार्टनरशिप फोरम दरम्यान सुरू करण्यात आलेला.गॅपमिल एक आंतरराष्ट्रीय सहकार कार्यक्रम आहे.गॅपमिलव्दारे जगातील सर्व नागरिकांमध्ये माध्यम आणि माहिती साक्षरतेसाठीची लोकांत जागृती वाढावी त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्याचा युनोस्कोचा प्रयत्न आहे. गॅपमिल कार्यक्रम माध्यम व माहिती साक्षरतेचा विकास आणि परिणामाला जागतिक पातळीवर चालना देण्याच्या दृष्टीने समर्पित आहे.शिक्षण,तंत्रज्ञान यासारख्या मुद्यावर नेतृत्व उभे करणे यासारख्या मुद्यावर काम करणार आहे.आशिया पॅसिफिक विभागात भारत,नेपाळ,भूटान,मॅनमार,श्रीलंका,येतात.येथील लोकांत माध्यम साक्षरेचे काम करणार आहेत.जावळे यांनी who सोबतही काम केले आहे.
इराण सरकारने नुकताच Student of Harcut festival भरवला होता. यामध्ये जगभरातून प्रोजेक्ट मागवले होते. या फेस्टीव्हलमध्ये जगभरातून 30 हजार प्रोजेक्ट आले होते. यामध्ये 165 प्रोजेक्टची निवड केली जाते. यामध्ये माझ्या प्रोजेक्टची निवड झाली असून कोरोनामुळे सन्मान सोहळा ऑनलाईन घेण्यात आला आहे.
जर्मनी येथे पीएच.डी.साठी निवड झाली होती तसेच आयआयटी पवई, मद्रास येथेही निवड झाली होती. टाटा इन्स्टिट्यूट येथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून निवड झाली होती. ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) मिळालेली आहे. टिळक विद्यापीठात शिकवण्याचे काम केले आहे.भरपूर ठिकाणी गेस्ट लेकचर्स दिलेले आहेत. यावर्षी 2020 सालासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात निवड झाली होती.या विद्यापीठात जगभरातून 30 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. येथे गाईडचीही मुलाखत घेतली जाते. या एका वर्षासाठी विद्यापीठात राहणे, खाणे मोफत देवून विद्यार्थीना शिक्षण दिले जाते. कोविडमुळे या निवडी थांबलेल्या आहेत. लंडन, कोस्टल येथेही परिषदेसाठी बोलवले होते, परंतु कोरोमुळे परिषद ऑनलाईन होणार आहे. – धम्मरत्न जावळे,युनेस्को गॅपमिल,जागतिक युवादूत पुणे