जागतिक हात धुवा मोहीम राबवा
जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांचे आदेश
सांगोला/ नाना हालंगडे
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक स्वच्छतेमध्ये स्वच्छ हात धुणे ही बाब महत्वपूर्ण आहे. त्यामुळे शुक्रवार १५ ऑक्टोंबर २०२१ रोजी जिल्ह्यात शाळा, अंगणवाडी , महाविद्यालय व ग्रामपंचायतीमध्ये जागतिक हात धुवानिमित्त स्वच्छ हात धुण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, दरवर्षी १५ अॉक्टोंबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा केला जातो.सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या दिनाचे महत्व मोठे आहे.स्वच्छ हात धुण्याचे फायदे व अस्वच्छ हातामुळे होणारे आरोग्यावर परिणामाबाबत नागरिकांमध्ये जाणिव जागृती होऊन नागरिकांमध्ये स्वच्छ हात धुण्याची सवय वृध्दींगत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती , ग्रामपंचायत, आरोग्य वर्धिनी केंद्र , जि.प.प्रा.प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसेच अंगणवाडीमध्ये शुक्रवार दि.१५ ऑक्टोंबर २०२१ रोजी स्वच्छ हात धुवा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
- हेही वाचा : कीर्तनातून समाज जागृती करणारी नवदुर्गा
- ‘शेकाप’च्या लाल रंगाशी एकरूप झालेली नवदुर्गा
- कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अथसहाय्य देणार
या दिनाचे औचित्य साधून तालुका ग्रामपंचायत स्तरावर खालील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर उपक्रमाच्या अनुषंगाने स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या उत्तम अंमलबजावणीसाठी जिल्हयातील शाळा व महाविद्यालयस्तरावर शालेय व अंगणवाडीस्तरावर हा उपक्रम स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून स्वच्छ हात धुण्याचे आरोग्यास असणारे फायदे याविषयी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
सदर जागतिक हात धुवा उपक्रम राबविताना कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.हा उपक्रम जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे राबविणे स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.त्यामुळे यामध्ये सर्वांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) स्मिता पाटील यांनी केले आहे.
——
ठळक मुद्दे
जागतिक हात धुवा दिनानिमित्त
जिल्ह्यात राबवावयाचे उपक्रम
१.साबणाने हात धुण्याचे प्रात्यक्षिक व समुदाय बैठकांचे आयोजन करणे
२.साबण गोळा करण्याची रॅलीचे आयोजन करणे
३.स्थानिक पातळीवर जागतिक हात धुवा दिनानिमित्त प्रचार व प्रसिध्दी करणे
४.संस्था स्तरावर विविध उपक्रम/ स्पर्धांचे आयोजन करणे