जवळ्याच्या बाजारात हरवलेला मुलगा अखेर सापडला
ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे आले यश
जवळा (विशेष प्रतिनिधी): जवळा येथे आठवडा बाजारामध्ये शुक्रवारी बारावर्षीय मुलगा हरवला होता. तो अखेर सापडला आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे हरवलेला मुलगा पाऊण तासात सापडला असल्याची माहिती पोलिस पाटील अतुल गयाळी यांनी दिली.
त्याचे झाले असे, शुक्रवार (8/10/2021) रोजी सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील, हनमंतगाव, ता. सांगोला येथील कु. मारुती गोविंद खांडेकर (वय वर्ष 12) हा सकाळी नऊ वाजता त्याच्या आजोबांसोबत शेजारील गाव जवळा येथे बाजारामध्ये सकाळी 9 वाजता आला होता. आजोबा बाजार करीत असताना तो हरवला होता.
- हेही वाचा : सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले
- सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी हरीश बैजल
- सोलापूरात राष्ट्रवादीचा काँग्रेसला झटका
- शेतकऱ्यांनो ऐकलत का? शासनाच्या अनुदानातून करा ड्रॅगनफ्रूट लागवड
हे कळताच कुटुंबीयांनी जवळील पाहुणे आणि गावात सगळीकडे शोधाशोध करूनही मुलगा सापडत नाही हे लक्षात येताच हनमंतगाव गावच्या सरपंच दिपाली तात्यासाहेब खांडेकर यांनी शुक्रवारी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबर वरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि अवघ्या पाऊन तासात हनुमंतगावचे उपसरपंच श्री दत्तात्रय गोविंद खांडेकर यांना कु. मारुती गोविंद खांडेकर हा सांगोले बस स्टॉप येथे सापडला. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापराने हरवलेला मुलगा सापडण्यासाठी मदत झाली.