जवळा गटातील जि.प. शाळांच्या दुरुस्तीसाठी 59 लाखांचा निधी
जि. प. सदस्या स्वातीताई कांबळे यांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वातीताई शटगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जि. प. सदस्या स्वातीताई कांबळे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे.
सांगोला / नाना हालंगडे
जवळा जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या विशेष दुरुस्तीसाठी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण भिंत, शौचालय बांधकाम, मैदान सपाटीकरण, पिण्याच्या पाण्याची सोय, जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोल्या बांधण्यासाठी 59 लाख 87 रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जि. प. सदस्या स्वातीताई कांबळे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील, जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व जि. प. सदस्या स्वातीताई कांबळे यांच्या प्रयत्नातून सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विशेष दुरुस्तीसाठी 59 लाख 87 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये जवळा नंबर 2 मधील दुरुस्तीसाठी 2 लाख 35 हजार रुपये, संगेवाडी गावठाणसाठी 2 लाख 85 हजार रुपये, संगेवाडी-मेथवडे फाटा 2 लाख 81 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संरक्षण भिंत शौचालय बांधकाम मैदान सपाटीकरण पिण्याच्या पाण्याची सोय या कामासाठी यामध्ये वाकी (घेरडी) माळी मोठे वस्ती संरक्षक भिंत बांधण्यासाठी 3 लाख 90 हजार रुपये, वाकी (घेरडी) शिंदेवाडी संरक्षक भिंत बांधण्यासाठी 3 लाख 95 हजार रुपये, जवळा, धुमाळवाडी संरक्षक भिंत बांधण्यासाठी 3 लाख 90 हजार रुपये, जवळा नंबर 2 संरक्षक भिंत बांधण्यासाठी 2 लाख 90 हजार रुपये, सावे संरक्षक भिंत बांधण्यासाठी 3 लाख रुपये, मेथवडे, शेंडगे, पवार, पाटील वस्ती संरक्षक भिंत बांधण्यासाठी 4 लाख 38 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
त्याच प्रमाणे सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या नवीन खोली बांधकामासाठी यामध्ये वाकी (घेरडी) केंद्र शाळेसाठी 8 लाख 61 हजार 904 रुपये, वाणीचिंचाळे गावठाण साठी 8 लाख 61 हजार 904 रुपये, सावे गावठाण साठी 8 लाख 14 हजार 904 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वातीताई शटगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जि. प. सदस्या स्वातीताई कांबळे यांच्या प्रयत्नातून अंगणवाडी दुरुस्तीसाठी मांजरी देवकतेवाडी साठी 1 लाख रुपये, आलेगाव अंगणवाडी साठी 1 लाख रुपये, सावे अंगणवाडी साठी 1 लाख रुपये, जवळा क्रमांक 2 साठी 1 लाख रुपये असा एकूण 59 लाख 87 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जि.प.सदस्या स्वातीताई कांबळे यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे जि.प. सदस्या स्वातीताई कांबळे यांच्या 15 व्या वित्त आयोगातून जवळा जिल्हा परिषद गटातील वाणीचिंचाळे बुद्धविहार जवळे हायमास्ट दिवा बसवण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये, जवळा बुद्ध विहारा जवळ हायमास्ट दिवा बसवण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये, राजापूर बाबासाहेब तोडकर घराजवळ हायमास्ट दीवा बसवण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये, राजापूर गावठाण ते लक्ष्मी दहिवडी रोड करण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपये, सावे आप्पा साळुंके घराजवळ हायमास्ट दिवा बसवण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये, देवळे सावर रस्ता मुरमीकरण करण्यासाठी 2 लाख 20 हजार रुपये, आलेगाव रामोशी समाज मंदिराजवळ पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपये, वाकी (घेरडी) दत्तमंदिर पाणीपुरवठ्यासाठी 4 लाख रुपये, वाकी (घेरडी) खांडेकर समाज मंदिर पाणीपुरवठ्यासाठी 3 लाख रुपये, वाकि (घेरडी) बुद्धविहार पाणीपुरवठ्यासाठी 3 लाख रुपये, आलेगाव ते दिवसे वस्ती सीडीवर्क कामासाठी 10 लाख रुपये असा एकूण जि.प. सदस्या स्वातीताई कांबळे यांच्या पंधराव्या वित्त आयोगातून 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.