जयंतराव घेरडीचे मैदान गाजविणार!
आखाडा झेडपीचा; डोंगरेंना मिळणार मोटेंची मदत!
सांगोला (नाना हालंगडे) : नावातच ‘जय’ अशातच मोटेंची साथ म्हणजे जयंतराव घेरडीचे मैदान गाजविणार! हे त्रिकालाबाधित सत्य. घेरडी गावातील उद्योगपती, शिक्षण तज्ज्ञ, युवकांचे आयडॉल, थोर समाजसेवक अशीच जयंतराव डोंगरे सरांची ओळख. त्यांनी घेरडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे.
घेरडी गावातील डोंगरे कुटूंबियांना राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबाही भाई आमदार गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी. त्यानंतर वडीलही शेकापमध्ये, तर नुसत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शेकापने जयंत डोंगरे यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी ही ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून लढविली. त्यात ते विजयी झाले. सध्या ते घेरडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून घेरडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याचा चंगच बांधला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी या गटातील सर्वच गावामध्ये दौरे सुरू केले आहेत.
कोण आहेत जयंतराव डोंगरे?
जिल्हयातील विविध शिक्षण क्षेत्रामध्ये अध्यक्ष व संचालक म्हणून हे कार्यरत आहेत. उद्योगपती अशी ही त्यांची ओळख आहे. तर अविराज एंटरप्रायजेस या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे उद्योग व्यवसायही आहेत. शिक्षण क्षेत्रातील गाढे अभ्यासक असून, युवकांचे आयडॉल म्हणून, गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे, दांडगा जनसंपर्क असलेले जयंतराव डोंगरे सर हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत.
शिक्षण क्षेत्रात व उद्योगात भरारी
श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ घेरडी या संस्थेचे ते संचालक आहेत. तसेच सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेचेही ते संचालक आहेत. ज्योतिर्लिंग क्रिडा शिक्षण प्रसारक मंडळ सलगर (ता. मंगळवेढा) या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. अविराज एंटरप्रायजेसचेही ते अध्यक्ष आहेत. विद्या पेट्रोलियम सिंगणहळ्ळी, श्री पेट्रोलियम कुंभारी ता. जत, अविराज पेट्रोलियम लांजा जि.रत्नागिरी, त्यांच्यासह अन्य उद्योगधंद्यामध्ये यांनी भरारी घेतलेली आहे.
- घेरडी जि.प. गट कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेणार
- जुजारपुरात २८ वर्षाच्या विवाहितेचा अनैतिक संबंधातून खून
- पत्रकारांनो फालतू प्रश्न मला विचारू नका! : ना. अजित पवार
दिलीप मोटे करणार मदत!
घेरडी गटातील राष्ट्रवादीचे वजनदार नेते दिलीप मोटे हे डोंगरे सरांना या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्व त्या परीने मदत करणार आहेत. याबाबत दिलीप मोटे यांनी स्वतःच सांगितले आहे. घेरडी जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, इथून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार या गटातून निवडून येणार आहे. जयंत डोंगरे सरांचे कार्य महान आहे. त्यामुळे त्यांनाही निवडणुक अगदीच सोपी जाणार असल्याचे दिलीप मोटे यांनी सांगितले.