ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षणशेतीवाडी
Trending

जनावरांतील विषबाधा टाळा

कोवळ्या पिकावरील धुरीण अपायकारक

Spread the love

जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेतेत वाया गेले असेल, तर असे पोंगे उन्हात वाळविल्यानंतरच खाऊ घालावेत. कारण उन्हात वाळविल्यानंतर त्यातील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते.

थिंक टँक /एच.नाना
चरायला मोकळे सोडल्यानंतर जनावर अखाद्य वस्तू आणि विषारी वनस्पती खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्वारीची कोवळी पोंगे आणि युरिया खाण्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणारी विषबाधा. या विषबाधेला ‘किरळ लागणे’ असेही म्हणतात.

कारणे
ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते.

लक्षणे
जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा मृत्यू होऊ शकतो. कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचे पोट फुगते, जनावर अस्वस्थ होते.
श्वासोच्छ्वास व ह्रदयाचे ठोके वाढतात. श्वसनाला त्रास होतो. जनावरे थरथर कापते.

उपचार
जनावरांचे पोट फुगलेले असते. त्यामुळे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावेत.

प्रतिबंधात्मक उपाय
जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेतेत वाया गेले असेल, तर असे पोंगे उन्हात वाळविल्यानंतरच खाऊ घालावेत. कारण उन्हात वाळविल्यानंतर त्यातील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते.

ज्वारीचे पीक कापून काढल्यानंतर काही शेतकरी ज्वारीच्या शेताला पुन्हा पाणी देतात. त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे फुटतात. अशा शेतामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.

जनावरांमध्ये बऱ्याच कारणांमुळे विषबाधा होते. त्यापैकी ज्वारीचे कोवळे पोंगे खाण्यात आल्याने, युरिया खाण्यामुळे, कीड रोग नियंत्रणासाठी फवारलेली कीटकनाशके, तणनाशक, उंदीरनाशक इत्यादी घटक जनावरांनी खाल्यामुळे विषबाधा होते.

या विषबाधेमुळे जनावरांमध्ये विविध दुष्परिणाम दिसून येतात. विषबाधेमुळे जनावर मृत्यू पावण्याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे विषबाधेची कारणे, लक्षणांची माहिती घेऊन वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

युरियाची विषबाधा
ही विषबाधा सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते. युरियाची विषबाधा होऊन बऱ्याच जनावरांचा मृत्यू होतो.

कारणे
युरियाचा पशू खाद्यामध्ये अधिक वापर. उदा. युरिया- मोलॅसिस, मुरघास. युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीन भरडा खाऊ घातल्यास. युरिया किंवा इतर खतांची पोती जनावरांनी चाटल्यास. दुभत्या जनावरांना खुराकातून अधिक प्रमाणात युरिया खाऊ घातल्यास.

लक्षणे
जनावरांच्या तोंडाला फेस येतो. जनावरांना नीट उभे राहता येत नाही. जनावरांची पोटफुगी होते. पोटामध्ये वेदना होतात.
जनावरे सतत उठबस करतात. थोडी थोडी लघवी करतात. जनावरांचे डोळे मोठे होतात. जनावरांना झटके येतात. जनावरे बेशुद्ध होतात. व शेवटी मृत्यू होतो. अधिक प्रमाणात युरिया खाल्ला असेल, तर अर्ध्या तासामध्येच मृत्यू होतो.

उपचार
युरियाची विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित जनावरांना २ ते ८ लिटर ताक पाजावे. ताक उपलब्ध नसल्यास माठातील किंवा रांजणातील थंड पाणी पाजावे. मोठ्या जनावरांना ४० लिटर व लहान जनावरांना २० लिटर पाणी पाजावे.

पोटातील हवा काढण्यासाठी घोड्याला घालतो तसा लगाम जनावरांच्या तोंडात घालावा. जेणेकरून जनावरांचे तोंड सतत उघडून पोटातील अमोनिया वायू बाहेर पडेल. शक्य तितक्या लवकर पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे

प्रतिबंधात्मक उपाय
शेतात पेरणी सुरू असताना खतांची पोती उघडी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. पोत्याचे तोंड व्यवस्थित बांधून घ्यावे. मोकळी सोडलेली जनावरे खत खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुखाद्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात युरियाचा वापर करू नये. पशुखाद्य पोती आणि खताची पोती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावीत. युरियाची प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीनची पेंड किंवा सोयाबीनचा भरडा जनावरांना खाऊ घालू नये.


हेही वाचा

बाबासाहेब : आमदार होण्याची कुवत असलेला नेता

बाबासाहेब, प्रती आबासाहेब

जवळ्याच्या म्हसोबा यात्रेवरील संकट दिपकआबांनी केले दूर

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका