जतमध्ये भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराजांच्या हस्ते वृक्षारोपण
नूतन तहसीलदार जीवन बनसोडेंचा केला सत्कार
जत : जत तहसील कार्यालयात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जतचे नूतन तहसिलदार जीवन बनसोडे यांचा सत्कार श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे वतीने तुकाराम बाबा महाराज यांनी वृक्ष भेट देवून केली. त्यानंतर तहसिल आवारात नूतन तहसिलदार जीवन बनसोडे यांच्या उपस्थितीतीत वृक्षरोपन करण्यात आले. यावेळी जतचे मंडळ अधिकारी संदीप मोरे, रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, कोतवाल सुभाष कोळी, संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे रूपेश पिसाळ, सागर मोरे, रोहित मोरे, बिराप्पा मोरे, राजू वाघमोड़े, कुमार इंगवले, अशोक स्वामी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, कोरोनाच्या या कठीण काळात आपणास ऑक्सिजनचे महत्व कळले आहे तेव्हा प्रत्येकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनला महत्व दिले पाहिजे. शासन व प्रशासनाने यासाठी गावपातळीवर लोकसहभागातून मोहीम राबवावी, असे आवाहन केले.