जतमधील शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करा
पालकमंत्री खाडे यांच्याकडे तुकाराम बाबा महाराज यांची मागणी
थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे
सांगली जिल्ह्यातील ९२ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे बदल्या झालेल्या शिक्षकांना तत्पर कार्यमुक्त करणे गरजेचे असताना ,सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना तत्पर कार्यमुक्त करावे या मागणीसाठी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम बाबा महाराज यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेतली आणि निवेदन दिले.
सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख
जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे सोमवारी जत दौऱ्यावर आले होते. गुडडापूर येथे मंत्री खाडे यांची तुकाराम बाबा यांनी भेट घेतली. यावेळी आतंरजिल्हा बदली झालेले विष्णू ठाकरे, दिलीप वाघमारे, देविदास ठोकळे, माधव गालचडवार, सुनिल साळवे, विलास मेंडके आदी शिक्षक उपस्थित होते.
मंत्री खाडे यांच्या भेटी दरम्यान तुकाराम बाबांनी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या भावना व्यक्त करत निवेदन दिले. यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी मंत्री खाडे यांच्या निदर्शनास आणून दिले की, २२ ऑगस्ट रोजी ओओटी पोर्टलव्दारे सांगली जिल्हा परिषदेकडील ९२ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झालेली आहे.
बदली झालेल्या शिक्षकांना पाच सप्टेंबर पर्यंत कार्यमुक्त करणेसंदर्भात शासनाचे आदेश आहेत. मात्र १०% ची अट दाखवून सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगली जिल्हा परिषदेकडील एकाही शिक्षकाला आतापर्यंत कार्यमुक्त केलेले नाही.
सांगली जिल्हयातून बाहेर जाणारे ९२ शिक्षक प्रदिर्घ काळापासून आपल्या गावाकडील परिवारापासून दूरावलेले असून त्यांना कौटुंबिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या दिव्यांगत्वाचा,आतापर्यंत केलेल्या प्रामाणिक सेवेचा,भावनिकतेचा व मानसिकतेचा पूर्णपणे विचार करून सर्व बांधवांना तात्काळ कार्यमुक्त करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात अशी मागणी केली.
पाहा खास व्हिडिओ