जतजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात, एक ठार, दोघे गंभीर जखमी
मृत पाटखळ (ता. मंगळवेढा) येथील रहिवासी
मंगळवेढा (विशेष प्रतिनिधी) : जत शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर पाच्छापूर फाट्याजवळ गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन मालवाहतूक ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
- हेही वाचा : नगरपरिषद निवडणूक ठरवणार सांगोल्याचा आमदार
सिध्देश्वर मधुकर इंगोले (वय-२२, रा. पाटखळ, ता. मंगळवेढा) असे अपघातात जागीच ठार झालेल्या ट्रक ड्रायव्हरचे नाव आहे. तर दुसऱ्या ट्रक एम एच-१६: 9598 मधील महेंद्र थोरात (रा. जामखेड) आणि तुषार टेकाळे (रा. बीड) हे दोघेजण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी जत येथील रूग्णालयात दाखल केले आहे.
- हेही वाचा : संघर्षाचा इतिहास पुन्हा घडवा : शरद पवार
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर पाच्छापूर फाटा येथे दोन्ही गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. दोन्ही गाड्या खचाखच भरलेल्या होत्या. धडक होताच दोन्ही गाड्यांच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यात सिध्देश्वर मधुकर इंगोले याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यात अनेक अडचणी आल्या. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. उशीराने जत पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
जवळ्याच्या बाजारात हरवलेला मुलगा अखेर सापडला
अपघात होताच मोठा आवाज
अपघात एवढा भीषण होता की, अपघात होताच मोठा आवाज झाला. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मदतकार्य केले. ट्रकमधून मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते.