सांगोला/नाना हालंगडे
जिथं बोलक्याला न्याय मिळत नाही तिथं मुक्याचं काय घेवून बसलाय? सांगोल्याचं पोलिसिंग वेगळ्याच स्तराला गेलंय. “सद रक्षणाय खलनिग्रहानय” हे ब्रीद काय सांगताय?
त्याच झाल असं सोमवार, 30 जानेवारी रोजीच्या पहाटेच्या दरम्यान तालुक्यातील डिकसळ येथे चोरट्यांनी एका मूकबधिर महिलेच्या घरी हात साफ केला. त्याच दिवशी सकाळी मुलीच्या वडिलांनी व मुलीने सांगोला पोलिसात तक्रार दिली. पण कोण जुमानतही नाही. कालचा दिवस गेला. आज पुन्हा मंगळवारही गेला. पोलिसाची साधी घटनास्थळाला भेटही दिली नाही. किती किती दुर्घटना घडली हे गावालाही माहीत आहे.
माजी सरपंचाची कन्या पिंका ही मूकबधिर… पै पै गोळा करून संसार थातला. पण कुण्या मेल्याची दृष्ट लागली समजले नाही. सव्वा तोळे सोने यासह अन्य काही वस्तू चोरट्यांनी लुटल्या. हीच पिंका आता भुई धरून बसली आहे. ती म्हणतेय.. पोलीसदादा जरा गरीबाकड पण ध्यान दे रे बाबा. आपल्या पण घरी अय्या बहिनी हायत्या की. तू भेट दिली म्हणजे, मुद्देमाल मिळत नाय.पण तेवढा तर दिलासा मिळतोय की?”
सांगोला तालुक्यात सध्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. पण चोरीचे गुन्हे दाखल होवूनही तपास लागत नाही. जी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ती सध्या गाढ झोपेत आहे. याचा पण नुसताच गलका झाला.
सध्या ग्रामीण भागात शाळवाचे दिवस सुरू आहेत. त्याबरोबर थंडीचा कडाकाही सुरू आहे. अशातच चोऱ्यांचा धडाकाही सुरू आहे. तालुक्यातील डिकसळ येथील घटना गंभीर असतानाही कोणीच लक्ष देईना झालंय. तीच बिचारी पिंका दोन दिवस झाले. साधे जेवण ही करीत नाही. पोलिसांना फोन केले. पण, ते वेगळीच करणे सांगित आहेत. त्यामुळे गरिबान कुणाकडं न्याय मागायचा हा यज्ञप्रश्न पडलेला आहे. तालुक्यात पोलिसांवरील विश्वासच उडाला आहे. त्यामुळे घरफोडी होवून तर काय उपयोग.
डिकसळमधील पिंका ही मुकी आहे. दोन मुली अन् एक मुलगा असा परिवार आहेत. जरी मुकी असली तरी, टेलरिंग व्यवसायात ही तरबेज होती. त्यामुळं कष्टानं कमविलेल हीच चोरान हिरावून नेल. ही पिंका मागील दोन दिवसांपासून भुई धरून आहे. चोरी होवूनही इकडे पोलीस तपासासाठी फिरकले नाहीत. हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.