ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

चंद्रकांत पाटील होणार गुजरातचे मुख्यमंत्री?

महाराष्ट्रात खळबळ, वस्तुस्थिती नेमकी काय?

Spread the love

चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याची बातमी पुढे येताच नेटकऱ्यांनी भाजप समर्थकांना चिमटे काढत मते मांडली. महाराष्ट्रातील चंद्रकांत दादा पाटील हेच या मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहेत. त्यांनाच तिकडे नेवून मुख्यमंत्री करावे असा काहीजणांनी सल्ला दिला.

थिंक टँक / नाना हालंगडे
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. गुजरात राज्यात घवघवीत यश मिळविल्यानंतर भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्रीपदी बसविले जाण्याची शक्यता आहे. मात्र चंद्रकात पाटील हे महाराष्ट्रातील नव्हे तर गुजरातेतील आहेत.

दुसरीकडे आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला मात्र तीन ते दोन अंकी आकडा गाठणंही कठीण आहे. बहुमतासाठी ९२ जागा जिंकणं आवश्यक आहे.

या निवडणुकीत भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा तसंच काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला होता.

एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपाला १८२ जागांपैकी ११७ ते १५१ जागा आणि काँग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना १६ ते ५१ जागा मिळतील, असा अंदाज होता.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आलेले आहेत. गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळतंय तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला. परंतु चंद्रकांत पाटील हे गुजरातचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुजरातमध्ये भाजप १५५ जागांच्या पुढे आहे. आजवरचं हे ऐतिहासिक बहुमत समजलं जात आहे. गुजरातमध्ये भाजप सरकार स्थापन करणार, हे जवळपास निश्चत झालेलं आहे.

चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.त्यांचं पूर्ण नाव चंद्रकांत रघुनाथ पाटील असं आहे. ते मुळचे महाराष्ट्रातले आहेत. गुजरातमध्ये भाजप मुख्यमंत्रीपदाची संधी कुणाला देणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील यांचंही नाव चर्चिलं जात आहे.

जळगाव येथे जन्म
चंद्रकांत पाटील यांचा जन्म 16 मार्च 1955 रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला. इथे एक ट्विस्ट आहे. सी.आर. पाटील यांचा जन्म झाला तेव्हा गुजरात नावाचं कोणतंही राज्य नव्हतं. गुजरात-महाराष्ट्र तेव्हा एकच प्रदेश होता. त्यांच्या वडिलांना पोलिसात नोकरी लागली. त्याामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब सुरतला स्थायिक झालं. त्यानंतर त्यांनी सुरतमधूनच पुढील शिक्षण घेतले. आयटीआयमधील डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. याच काळात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

सी.आर. पाटील वडिलांच्या जागी 1975 मध्ये पोलिसात रुजू झाले. 1984 मध्ये त्यांनी पोलिसांची युनियन स्थापण्याचा प्रयत्न केला. बड्या पोलिस अधिकाऱ्यांना ते पटलं नाही. त्यामुळे त्यांना पोलिसातून निलंबित करण्यात आलं. 1989 मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींच्या मार्गदर्शनात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सन 2009 मध्ये ते भाजपच्या तिकीटावर नवसारी मतदारसंघांतून पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले.

2014 मध्ये त्यांनी पुन्हा नवसारीची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकली. 2019 मध्ये ते सलग तिसऱ्यांदा खासदार झाले. याहून मोठी गोष्ट म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाटील वाराणसीत पंतप्रधान मोदींसाठीही काम करत होते. पक्षाने त्यांना बनारसमध्ये निवडणूक समन्वयक म्हणून काम दिलं होतं.

सोशल मीडियावर चर्चा
गुजरात राज्यात भाजपने घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर या यशाचे शिल्पकार म्हणून चंद्रकांत तथा सी.आर. पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याची बातमी पुढे येताच नेटकऱ्यांनी भाजप समर्थकांना चिमटे काढत मते मांडली. महाराष्ट्रातील चंद्रकांत दादा पाटील हेच या मुख्यमंत्री पदासाठी पात्र आहेत. त्यांनाच तिकडे नेवून मुख्यमंत्री करावे असा काहीजणांनी सल्ला दिला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका