“घे चुना.. मळ पुन्हा” गायछाप गुजरातेत गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही
मिम्सची सोशल मीडियावर धूम

थिंक टँक / नाना हालंगडे
“जरा पुडी बघू” म्हणून कोणत्याही दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संवाद सुरू होतो, तेंव्हा ती पुडी ‘गाय छाप जर्दा’ची असणे, हे बहुतेकदा निश्चित असते. याच गायछापची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. वेदांता पाठोपाठ एकेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. गायछाप महाराष्ट्राबाहेर गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सरकारला सुनावले आहे.
महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असताना सोशल मीडियावर ‘गायछाप ‘ ब्रँड चर्चेत आला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असताना सोशल मिडियावर ‘ गायछाप’ ब्रँड चर्चेत आला आहे . सोशल मीडियावर गायछाप ट्रेंडिंगमध्ये आहे.
वेदांत आणि फॉक्सकॉन , बल्क ड्रग पार्क , टाटा एअरबस आणि सॅफ्रन हे चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यावरुन विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असताना सोशल मीडियावर ‘गायछाप’ ब्रँड चर्चेत आला आहे . सोशल मीडियावर गायछाप ट्रेंडिंगमध्ये आहे. गायछापचं नाव घेत नेटकऱ्यांनी सरकार आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे.
9 जुलै 1994 साली पहिल्यांदा गायछाप जर्दा बाजारात आला. मालपाणी उदयोगाचा हा गायछाप ब्रँड बघता बघता इतका लोकप्रिय झाला की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या ब्रँडची क्रेज पसरली. सुरुवातीला गायछापची पुडी 3 रुपयाला होती. वाढत्या महागाईबरोबर गायछाप पुडीची किंमतही वाढत गेली. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये तर गायछाप पुडी मिळवण्यासाठी लोक कुणी सांगेत तिकडे फिरत होते. वाटेल ती किंमत देत होते . यामुळेच लॉकडाऊनमध्ये देखील गायछापचा उद्योग काही बुडाला नाही.
“गायछाप उद्योग प्रकल्प गुजरातला गेल्याशिवाय महाराष्ट्राला जाग येणार नाही वाटतं … ” अशी पोस्ट गायछापच्या पुडीच्या फोटोसह सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. गावातल्या पारावर, एसटी स्टँडवर, चहाच्या दुकानावर ते अगदी मुंबई शहरातील विविध नाक्यांवर कुणाच्या हातात गायछापची पुडी दिसली की अनोळखी पण एकमेकांच्या ओळखीचे होतात. गायछापमुळे अनेकांची मैत्री झाली आहे.
ऐवढ्या वर्षात आजही गायछापची ट्रेंड कायम आहे. गाय छाप जर्दा हा तंबाखूचा एक प्रकार आहे. संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाने गायछाप ब्रँड बाजारात आणला. मालपाणी उद्योग समूहाचे गायछाप हे प्रमुख उत्पादन आहे.
गाय छाप जर्दा’ या उत्पादनाची सुरुवात या मालपाणी उद्योग समूहाने ९ जुलै इ.स.१८९४ रोजी केली. दामोदर जगन्नाथ मालपाणी यांनी हा जर्दा भारतीय बाजारपेठेत प्रस्तुत केला. ते जर्दा या प्रकाराचे पहिले उत्पादक होते. ‘गाय छाप जर्दा’या तंबाखूस मराठी, हिंदी अन्य भारतीय भाषेतील साहित्यात एक साहित्यिक संदर्भ आणि मूल्य आहे.
“जरा पुडी बघू” म्हणून कोणत्याही दोन अनोळखी व्यक्तींमध्ये संवाद सुरू होतो, तेंव्हा ती पुडी ‘गाय छाप जर्दा’ची असणे, हे बहुतेकदा निश्चित असते. या संवादाचे वर्णन केल्याखेरीज भारतीय ग्रामीण साहित्य पूर्ण होऊ शकत नाही. याचे प्रत्यंतर सर्व प्रादेशिक भाषेतील साहित्यात, लेखनात आढळते. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, कविता, यात तर ते आढळतेच. लेखकास त्याचे वर्णन करण्यासाठी खूपच निरीक्षण करणे आवश्यक असते. खास करून नाटकात ‘जर्दा’ खाण्याचा अभिनय करणे, ही अभिनयाची कसोटी असू शकते.
एवढेच नव्हे तर मारामारी, ‘बा’ ‘चा ‘बा’ची ऊर्फ शिव्यागाळीतही जर्दाच्या आदरपूर्वक उल्लेखाची परंपरा आढळते. ‘गाय छाप जर्दा’ हे मराठी माणसाचे महाराष्ट्रातील उत्पादन असल्याने मराठी साहित्यात त्याचे साहित्यिक प्रतिबिंब प्राथम्याने आढळते. इतर प्रादेशिक भाषांमध्ये – कन्नड, तेलगू, तमिळ या दक्षिणी भाषेतही ते आढळते. ‘गाय छाप’ ही तंबाखू असल्याने तिच्यामुळे कर्करोग होतो. तसा वैधानिक इशाराही देण्यात येतो.