घेरडीत लोकप्रतिनिधी हातघाईवर येतात तेव्हा..
शेकापमधील खदखद रोखण्याचे डॉक्टर बंधूंसमोर आव्हान
सांगोला/ एच. नाना
जिल्हात अतिसंवेदशील गाव म्हणून घेरडीची ओळख आहे. इथले राजकारण तर टोकाचेच. विविध विकासकामांना सतत खोडाच.. अशातच मागील दोन दिवसापूर्वी गावातील दोन लोकप्रतिनिधींचा राडा झाला. तो ही विकासकामावरुनच.. ही शेकापमधील खदखद जोमाने उफाळली आहे. या खदखदीला रोखण्याचे काम पक्षातील धुरिणांना करावे लागणार आहे.
राजकारणात कोणीही कायमचा नसतो. मात्र एकमेकांची जिरवाजिरव करणे हे नित्याचेच झाले आहे. असाच प्रकार तालुक्यातील घेरडी गावामध्ये मागील दोन दिवसापूर्वी घडला. याची ही तक्रार भाई चंद्रकांत देशमुख यांच्यापर्यंतही गेली. मग काय या लोकप्रतिनिधींची पाचावर धारण बसली.
तालुक्यात शेकापमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी पहावयास मिळत आहे. यामध्ये घेरडी गावही आघाडीवर आहे. त्यामुळे तर विकास खुंटलेला आहे. जो कोणी शासकीय कामे करतो तो खड्ड्यात जात आहे. असाच प्रकार गावातील आरओ प्लांटच्या बाबतीत घडला. हा प्लांट हायस्कूलशेजारी उभारण्यात आलेला आहे. तसेच आमच्या वाडी-वस्तीला विकासकामे का नाहीत? यावरूनच विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यात हा राडा झाला. ऐन चौकातील या हातघाईमुळे दिवसभर याचीच ही चर्चा गावात सुरू होती. अन् सरते शेवटी ही तक्रार सांगोल्यातही गेली.
तालुक्यात प्रस्थपित असलेल्या शेकापमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. भाई स्व. आम. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर हे वाद सुरूच आहे.
तालुक्यात शेकापमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी पहावयास मिळत आहे. यामध्ये खरे तर दोन्ही डॉक्टरबंधूंनी लक्ष घालून वाद मिटविणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्यापुढे खरी वस्तुस्थिती जात नसल्याने विसंवाद वेगळे रूप धारण करताना दिसत आहे.
- हेही वाचा : ‘बाबासाहेब’ तुम्हीच आहात ‘आबासाहेब’