घेरडीत उद्या महिलांचा बंपर कार्यक्रम, मिळणार सोन्याच्या नथीची २० बक्षीसे

सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील घेरडी येथे स्व. आमदार गणपतराव देशमुख विचारमंच व घेरडी पंचायत समिती गण महिला आघाडीच्यावतीने महिलांसाठी हळदी कुंकू व भव्य स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आले असल्याची माहिती घेरडीच्या सरपंच सुरेखाताई पिंटू पुकळे यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील घेरडी येथे पंचायत समिती गण महिला आघाडीच्यावतीने महिलांसाठी व भव्य सर्धेचे आयोजन करण्यात आले असून ,या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला, श्रीमती कल्पनाताई शिंगाडे ,व्हा.चेअरमन महिला सूतगिरणी सांगोला, सौ. राणीताई माने ,माजी नगराध्यक्षा सांगोला, सौ.स्वातीताई मगर ,माजी उपनगराध्यक्षा, सांगोला, सौ.छायाताई मेटकरी ,नगरसेविका सांगोला, सौ.उज्वलाताई गिरीष नश्टे, माजी संचालिका महिला सूतगिरणी सांगोला यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख उपस्थिती म्हणून सांगोला पंचायत समितीच्या माजी सभापती मायाक्काताई यमगर, आगलावेवाडीच्या माजी ग्रा.पं. सदस्या सुमनताई। यमगर, वैशाली राजेंद्र गावडे, स्मिताताई कांबळे, बुरंगेवाडी सरपंच राजाक्का अर्जुन बुरंग, भापसेवाडी सरपंच रंजना श्रीपती वगरे, तरंगेवाडी सरपंच उज्वला अनिल गावडे, आगलावेवाडीच्या सरपंच शांताबाई हरिश्चंद्र हाके आदी उपस्थित राहणार आहेत.
यांच्यासह घेरडी पंचायत समिती गणातील घेरडी, डिकसळ, हंगरगे, नराळे, पारे, हबिसेवाडी, गावडेवाडी आदी गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्या, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी सोन्याच्या नथीची २० बक्षिसे व स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला वर्गासाठी आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
हा कार्यक्रम उद्या शनिवार २८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजलेपासून घेरडी जि.प.प्रा.शाळा, घेरडी येथे संपन्न होणार आहे. तरी घेरडी पंचायत समिती गण व तालुक्यातील महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे अस आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा