सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील घेरडीजवळील एका वस्तीवर वीज कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत तीन शेळ्या जागीच ठार झाल्या आहेत.
बिचुकले- गरंडे वस्ती येथे सायंकाळी साडे चार वाजता वीज पडून 3 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. रामा बाळू बिचुकले व बापू नामदेव गरंडे हे दोघेजण रानात शेळ्या चारत असताना अचानक वीज पडली आणि त्यामधे 3 शेळ्या ठार झाल्या. या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास चाळीस हजाराचे नुकसान झाले आहे.
तालुक्याला परतीच्या पावसाचा दणका
सांगोला तालुक्यात परतीचा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. मागील तीन दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. या सततच्या पावसामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.
अनेक ठिकाणचे तलाव भरले
परतीच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये असणारे तलाव भरत आल्याचे दिसून येत आहे. त्याचा फायदा पिकांना होणार आहे.
हेही वाचा
माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील