गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशल
Trending

घेरडीच्या पेट्रोल पंपावर दरोडा

चाकूचा धाक दाखवून 2 लाख लुटले

Spread the love

दिवसभर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम पंपाच्या ऑफिस मधील लॉकरमध्ये ठेवली जाते. सोमवार, २० रोजी रोहन जगधने व योगेश कांबळे यांनी दिवसभर पेट्रोल विक्रेत्यातून जमा झालेले सुमारे २ लाख १ हजार रुपये हर्षद सोनवणे यांच्या ताब्यात देवून निघून गेले.

सांगोला/ नाना हालंगडे
स्कार्पियोमधून डोक्याला कान टोपी व तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चौघांनी पेट्रोल पाहिजे असा बहाना करून कामगाराच्या गळाला चाकू लावला व चावीने लॉकर उघडून सुमारे २ लाख १६ हजार रुपयेची रोकड घेऊन त्याच स्कार्पिओ मधून सुसाट वेगाने निघून गेले. ही घटना मंगळवार २१ रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास घेरडी ते वाणीचिंचाळे ता सांगोला जाणाऱ्या रोडवरील श्याम पेट्रोल पंपावर घडली. A robbery at a petrol pump in Gherdi. 2 lakh looted at knifepoint.

याबाबत, हर्षद गजानन सोनवणे रा. घेरडी यांनी अज्ञात चौघा विरुद्ध फिर्याद दिली आहे. दरम्यान खिलारवाडी येथील घरपोडीनंतर सलग दुसऱ्या दिवशी चौघांनी कामगारास चाकूचा धाक दाखवून रोकड लंपास केल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. Think Tank Live

(Advt.)

कोल्हापूर येथील मनीषा जाधव यांच्या मालकीचा पंप

कोल्हापूर येथील मनीषा मानसिंग जाधव यांच्या मालकीचा घेरडी ते वाणीचिंचाळे ता सांगोला जाणाऱ्या रोडवर एचपी पेट्रोल कंपनीचा श्याम पेट्रोलियम या नावाने पंप आहे. सदर पंपावर फिर्यादी , हर्षद गजानन सोनवणे व चैतन्य सरगर दोघेही रा.घेरडी व रोहन जगधने रा. वाणीचिंचाळे, योगेश कांबळे रा. पारे ता. सांगोला असे चौघेजण कर्मचारी म्हणून कामास आहेत.

जमा झालेले सुमारे २ लाख १ हजार लुटले

दिवसभर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम पंपाच्या ऑफिस मधील लॉकरमध्ये ठेवली जाते. सोमवार, २० रोजी रोहन जगधने व योगेश कांबळे यांनी दिवसभर पेट्रोल विक्रेत्यातून जमा झालेले सुमारे २ लाख १ हजार रुपये हर्षद सोनवणे यांच्या ताब्यात देवून निघून गेले. सदर रक्कम मोजून त्याने लाॅकरमध्ये ठेवली सायंकाळी सहानंतर हर्षद सोनवणे व चैतन्य सरगर या दोघांनी पंपावर वाहनांना सोडलेल्या तेलातून जमा झालेले १५ हजार रुपये रात्री ११:३०च्या सुमारास त्याच लॉकरमध्ये ठेवून दोघे ऑफिसमध्ये झोपले होते. Think Tank Live

तिघांचे तोंड कानटोपी व रुमालाने बांधलेले होते

काल मंगळवार २१ रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास बाहेरून ऑफिसचा दरवाजा कोणीतरी वाजवला म्हणून हर्षदने उठून पाहिले असता बाहेर तिघेजण उभे होते. त्याने त्यांना तुम्हाला काय पाहिजे असे विचारले असता त्यांनी आम्हाला पेट्रोल पाहिजे असे म्हणाले. त्यावेळी तिघांचे तोंड कानटोपी व रुमालाने बांधलेले होते.

गळ्याला चाकू लावून…

त्यांना पेट्रोल देण्याकरता हर्षद ऑफिस बाहेर आला असता तिघांपैकी एकाने त्याच्या गळ्याला चाकू लावून पैसे द्या असे म्हणाला असता त्याने लाॅकर लाॅक आहे. आमच्याकडे पैसे नाहीत असे म्हणाला त्यावेळी त्यांनी चाकू दाखवून त्यास ऑफिसमध्ये घेऊन गेले व त्यांनी चैतन्य सरगर यासही उठवले. तेव्हा त्यांच्यातील एकाने चावीने लॉकर उघडून २ लाख १६ हजार रुपये काढून घेतले व बाहेर उभे असलेल्या स्कार्पिओ जीपपर्यंत हर्षदच्या गळ्यास चाकू लावून घेऊन गेले. Think Tank Live

तत्पूर्वी ड्रायव्हर गाडी चालू करून सीटवर बसलेला होता. ते सर्वजण गाडीत बसल्यावर हर्षदला ढकलून देऊन जीप घेरडी ते वाणीचिंचाळे रोडने सुसाट निघून गेली . घडला प्रकार हर्षदने मॅनेजर पंजाबराव साळुंखे रा. जवळा यांना फोनवरून सांगितल्याचे त्यांने फिर्यादीत म्हटले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका