गुवाहाटीतल्या बहुचर्चित रेडिसन ब्ल्यू हॉटेलच्या मालकाची आत्महत्या
थिंक टँक / नाना हालंगडे
रेडिसन ब्लूचे मालक अमित जैन यांनी शनिवारी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. यामुळे हॉटेल विश्वात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मृतदेह ताब्यात घेतला आहे
अमित जैन यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अमित जैन यांना पदपरगंज येथील मॅक्स रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या आत्महत्येमागे व्यवसायातील मोठे नुकसान असल्याचे सांगण्यात येत आहे. कौटुंबिक सूत्रे अद्याप उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. अमित जैन यांच्या फ्लॅटमधून दिल्ली पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्याच्या घराची आणि वाहनाची झडती घेतली जात आहे.
रेडिसन ब्लू हॉटेल गाझियाबादमधील मेरठ-दिल्ली एक्सप्रेसवेच्या किनारी कौशांबी येथे आहे. पंचतारांकित हॉटेलला लागूनच रेडिसन टॉवर आहे. त्याचे मालक अमित जैन हे बराच काळ आपल्या कुटुंबासह दिल्लीतील खेलगाव येथे एका फ्लॅटमध्ये राहत होते.
रॅडिसन ब्लू हॉटेलचे मालक अमित जैन यांचा मृतदेह त्यांच्या सदनिकेत शनिवारी सकाळी संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. आत्महत्येची माहिती दिल्लीच्या मांडवली पोलीस ठाण्याला मिळाली खरी पण घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना कोणतीही नोट मृतदेहाशेजारी सापडली नाही. पोलिस त्यांच्या मृत्यूची कसून चौकशी करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने त्यातून कसं बाहेर पडायचं, याची चिंता त्यांना सतावत होती. गेली अनेक महिने यावर त्यांचा विचार सुरु होता. पण त्यातून मार्ग न निघाल्याने त्यांनी अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
सकाळी साडे आठच्या सुमारास अमित अगदी नेहमी घरातून बाहेर पडतात तसे घराबाहेर पडले. कारमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे लहान भाऊही होते. अमित जैन यांनी आपल्या भावाला गाझियाबाद येथील कार्यालयात सोडले. नंतर मीटिंगला जातो, असं सांगून ते तेथून निघून गेले. दुपारी त्यांचा मुलगा आदित्य काही सामान घेण्यासाठी खेळगाव येथील फ्लॅटवर पोहोचला असता त्यांना वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मुलाने पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत मॅक्स हॉस्पिटल, पटपरगंज येथे नेलं गेलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कोरोना काळात हॉटेल व्यवसाय अतिशय मंदीत होता. जगभरातील हॉटेल व्यवसायिक टेन्शनमध्ये होते. कोरोना काळात पर्यटन बंद असल्याने साहजिक पर्यटकांची रेलचेल नव्हती. अशा काळात घेतलेल्या कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे? घेतलेल्या कर्जाजी मुद्दल कशी फेडायची? असं असताना व्याज तर वाढत होतं… गेल्या अनेक महिन्यांपासून याच १०० कोटींच्या परताव्याची चिंता अमित जैन यांना सतावत होती. मात्र त्यांनी आपल्या डोक्यातील विचार कुटुंबियांना कळू दिला नाही.
सगळं व्यवस्थित सुरु आहे, असं कुटुंबियांना भासवलं. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या घराबाहेर पडले. यावेळी त्यांचा भाऊही त्यांच्या सोबत होता. त्याला अमित यांनी ऑफिसला सोडलं. मी मिटिंगला जातोय, मी निघतो… असं सांगून त्यांनी आपल्या फ्लॅटच्या जवळ गाडी पार्क केली. तिथून ते घरी पोहोचले. नंतर काहीच वेळात त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
नंतर त्यांचा मुलगा जेव्हा फ्लॅटवर पोहोचला, तेव्हा त्याला आपल्या बाबांचा मृतदेट टांगलेल्या अवस्थेत दिसला. त्याने तत्काळ पोलिसांना फोन लावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांचा शवविच्छेदन अहवाल आज रविवारी दुपारी येणार आहे. ज्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लूचे मालक अमित जैन यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. सकाळी साडे आठच्या सुमारास अमित अगदी नेहमी घरातून बाहेर पडतात तसे घराबाहेर पडले. कारमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे लहान भाऊही होते. अमित जैन यांनी आपल्या भावाला गाझियाबाद येथील कार्यालयात सोडले. नंतर मीटिंगला जातो, असं सांगून ते तेथून निघून गेले.
दुपारी त्यांचा मुलगा आदित्य काही सामान घेण्यासाठी खेळगाव येथील फ्लॅटवर पोहोचला असता त्यांना वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. व्यवसायात झालेल्या नुकसानीनंतर ते प्रचंड अस्वस्थ झाले होता, मात्र ते टोकाचं पाऊल उचतील, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
कोविडच्या काळात सगळेच हॉटेल बंद राहिल्याने व्यवसायात प्रचंड मोठं नुकसान झालं. त्यामुळे अमित जैन यांना खूप त्रास सहन करावा लागला. कर्जाचे व्याज वाढतच गेले आणि कर्जाची रक्कम मोठी होत गेली. अशा परिस्थितीत अमित यांनी धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी टोकाचं पाऊल उचललं.
अमित यांच्या जाण्याने त्यांच्या पत्नी नीतू जैन आणि मुलगी खुशी जैन यांना मोठा धक्का बसलाय. त्यांना ज्यावेळी अमित यांना मृत्यूची बातमी कळाली, तेव्हा त्या धायमोकलून रडायला लागल्या. बँका कर्ज परत करण्यासाठी त्यांचा छळ केला करत होत्या का? याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स पोलीस मिळवत आहेत.