गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी धुक्याची झालर
पूर्वाचे कालच झाले आगमन; तालुकाभर मोठा उत्साह
सांगोला/ नाना हालंगडे
कोरोना महामारीनंतर यंदा प्रथमच गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून सर्वत्र लगबग पहावयास मिळत आहे. असे असले तरी, गणेश उत्सवाच्या पाहिल्याच दिवशी तालुक्यातील काही गावात धुक्याचे साम्राज्य पहावयास मिळाले. अशातच पावसाचे सातवे नक्षत्र पूर्वा ही काल मंगळवार 30 ऑगस्ट रोजी निघाले असून,याचे वाहन असलेला मेंढा किती बरसतो हेही पहावयास मिळणार आहे.
पावसाळा सुरू होवून तीन महिने उलटले, पण सांगोला तालुक्यात अजूनही म्हणावा तसा दमदार पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळ जन्य परिस्थिती आहे. काल गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर एक दिवस पावसाळा सुरुवात झाली आहे. या दहा दिवसात पाऊस झाला तर,सांगोला तालुक्याचा दुष्काळचं हटेल.
श्रावण संपला तशी भाद्रपदाला सुरुवात झाली. सणाचा राजा असलेला गणेश उत्सव ही आज बुधवार 31 ऑगस्टपासून सुरूही झाला. गेली दोन वर्षी तालुक्यात दमदार पाऊस झाला होता. यावर्षी मात्र म्हणावा तसा पाऊस नाही,त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे.रब्बी हंगाम साधलेला आहे,पण पुढे खरीप कसा साधावयाचा याच विवंचनेत,बळीराजा आहे. आता तसा परतीचा पाऊसच आपल्याकडे म्हणावा लागेल,पण तोही पडेना झालाय.
गणेश संपूर्ण आरती आणि बरंच काही
पाऊसाचे सातवे नक्षत्र पूर्वा मंगळवारी पहाटे सुरू झाले आहे. हेच नक्षत्र 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता संपनार आहे. या नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. याच नक्षत्रात 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडणार आहे. आजपासून गणेश उत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झालेली आहे. पण पहिल्याच दिवशी धुक्याची झालर सांगोला तालुक्यातील काही गावात पहावयास मिळाली.
आता हक्काची अशी पाऊसाची नक्षत्रे संपलेली आहेत.याच पुर्वानंतर उत्तरा,हस्त,चित्रा आणि स्वाती ही चार नक्षत्रे उरलेली आहेत.तर का याच उत्सवात हा पाऊस सापडला तर,दहा दिवसांचा हा पाऊस बळीराजाला सुखकारक ठरणार आहे.
बळीराजा चिंताग्रस्त
आता कसेतर रब्बी हंगाम बऱ्यापैकी साधलेला आहे. पण पुढे वर्षभर कसे करावयाचे,अजूनही सांगोला तालुक्यात दमदार पाऊस नाही. तालुक्यातील सर्वच नद्या कोरड्या पडलेल्या आहेत. ओढे, नाले,तळी,बंधारे कोरडी पडलेली आहेत.त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त आहे.जय गणेशा आता तरी परतीचा पाऊस सांगोला तालुक्याला दे म्हणून ही मंडळी साकडे घालीत आहे.
रोगराईला निमंत्रण
पाऊसाला सुरू होवून तीन महिने संपले तरी सांगोला तालुक्यात दमदार पाऊस नाही.पण श्री.गणेशाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी धुक्याची झालर पहावयास मिळाली.त्यामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांवर आता रोगराई पहावयास मिळणार आहे.तालुक्यात अजूनही दमदार असा पाऊस नाही.त्यामुळे पुढचा काळ कठीन असाच आहे.