ताजे अपडेट
Trending

गणपतराव देशमुख यांचे चरित्र नव्या पिढीस प्रेरणादायी : प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

Spread the love

सांगोला / नाना हालंगडे
गणपतराव देशमुख यांनी सामान्य माणसांची अस्वस्थता जपण्याचे काम आयुष्यभर केले. शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर ते विधानसभेत सरकारला हादरे देऊन निर्णय घ्यायला लावत असे. शांत व संयमाने काम करून सर्वसामान्यांच्या हृदयात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. नम्रतेचा बादशाह म्हणून आबासाहेबाकडे पाहावे लागते. अशा हिमालया एवढ्या उंचीच्या व्यक्तीचे चरित्र हे नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे मत प्रा. डॉ. किसन माने लिखित राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.

सदर प्रसंगी व्यासपीठावर श्रीमती रतनबाई (बाईसाहेब)गणपतराव देशमुख माजी आमदार रामहरी रुपनवर, महानंदा दूधसंघाचे संचालक चंद्रकांत दादा देशमुख, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, शिवसेनेचे युवक नेते सागर पाटील, सूतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, माजी नगराध्यक्ष राणीताई माने, डॉ. रणजीत केळकर, साहित्यिक कृष्णा इंगोले, सूतगिरणीचे माजी चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतन केदार, श्रीमती कल्पनाताई शिंगाडे, शेकापचे चिटणीस दादाशेठ बाबर, सूतगिरणीचे संचालक बाळासाहेब बनसोडे, माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, सुरेश अप्पा माळी, माजी उपसभापती नारायण जगताप, प्रा. डॉ. किसन माने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सदर चरित्र ग्रंथाचे प्रकाशन श्रीमती रतनबाई (बाईसाहेब) गणपतराव देशमुख, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार रामहरी रुपनवर, चरित्रकार प्रा. डॉ. किसन माने व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

श्रीमती रतनबाई (बाईसाहेब) गणपतराव देशमुख यांचा सत्कार कल्पना माने व प्रिया माने यांनी केला. अध्यक्ष प्रा. ढोबळे सर यांचा सत्कार प्रा. किसन माने यांनी केला. प्रमुख पाहुणे रामहरी रुपनवर यांचा सत्कार महादेव माने यांनी केला. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार माने परिवारांच्या वतीने करण्यात आला.

रामहरी रुपनवर म्हणाले की, या चरित्र ग्रंथात गणपतराव देशमुख यांचे जीवन कार्य उत्तमरीत्या डॉ. किसन माने यांनी मांडले आहे. आज राजकारण खूप बिघडले आहे. अशा बिघडलेल्या राजकीय वातावरणात गणपतराव देशमुख यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे. आबासाहेब हयातभर आपल्या निष्टेशी आणि आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहिले. याचे वर्णन अनेक पैलूंच्या माध्यमातून या पुस्तकात आले आहे. सध्याच्या मुलासाठी आणि राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आबासाहेब वरील हे पुस्तक अनमोल ठेवा आहे.

आज गणपतराव देशमुख यांच्या विचाराने आणि कृतीने पुढे जाण्याची गरज आहे. म्हणून आबासाहेबांवरील हे पुस्तक महाराष्ट्रातील नव्या राजकीय तरुणांना राजकीय नेत्याची आचारसंहिता कशी असावी, याची शिकवण देणारे आहे, असे शेवटी ते म्हणाले.

चंद्रकांत दादा देशमुख म्हणाले की, या चरित्र ग्रंथातून आबासाहेबांच्या कार्याचा आलेख उभा करून आबासाहेबांच्या जीवनावर सर्वंकष प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पुरोगामी चे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, आबासाहेब हे स्वतः व कुटुंब यांच्यापेक्षा सर्वसामान्य जनता हे माझं सर्वस्व आहे, असं मानून जे काम करण्याचा निर्धार केला.

दुष्काळी भागाचं निर्मूलन करण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली, ती त्यांनी सत्त्यात उतरून दाखवली. त्यामुळेच या ग्रंथाचे महत्त्व त्या दृष्टीने अधोरेखित करण्यासारखे आहे. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा उत्कृष्टरित्या या ग्रंथात मांडल्याचा दिसून येतो. याप्रसंगी डॉ. प्रभाकर माळी, डॉ. कृष्णा इंगोले, प्रा. नानासाहेब लिगाडे, विनायक कुलकर्णी सर यांनीही मनोगत व्यक्त करून आबासाहेबांच्या जीवनावरील हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पक्षातील नेत्यांना करताना त्यांना मार्गदर्शक ठरेल, अशा भावना व्यक्त केल्या. लेखक मनोगत व्यक्त करताना

प्रा. डॉ. किसन माने म्हणाले की, आबासाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, पाणीचळवळ व सर्वच क्षेत्रातील कार्य इतके उत्तुंग आहे. त्यांचे कार्य केवळ एका पुस्तकात सामावणे शक्य नाही. तरी हा मी अल्पसा प्रयत्न केला आहे. त्यांचा एकेक पैलू हा आपणा सर्वांना विचार प्रवण करणार आहे. या चरित्र ग्रंथास अनेकांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुकुंद वलेकर यांनी करून गणपतराव देशमुख यांच्या चरित्राचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जत येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. श्रीकांत कोकरे यांनी संवादी माध्यमातून करून प्रेक्षकांना जोडून ठेवण्याचे काम केले. तर कार्यक्रमाचे आभार साहित्यिक शिवाजी बंडगर यांनी मांनले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. दीपक रिटे, विनायक कुलकर्णी सर, सोमा आबा मोटे, पिंटू दादा पुकळे, प्रा. अशोक कांबळे, सिदा मेटकरी, महादेव माने, कल्पना माने, अंकिता माने, कल्पना मेटकरी, प्रिया माने, अरुण बंडगर, महेश बंडगर, बापू माळी सर, डॉ. रुपेश माने, डॉ. निलेश माने, योगेश माने, नितेश माने, प्रवीण माने, प्रकाश बिचुकले, आगतराव माने, दिलीप माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमात साहित्यिक ज्ञानेश डोंगरे व कवी शिवाजी बंडगर गुरुजी यांनी आपल्या अतिशय भावमधुर कविता सादर करून सर्व रसिक श्रोत्यांना आणि मान्यवरांना खिळवून ठेवले.

सदर कार्यक्रम प्रसंगी मारुती आबा बनकर, प्रभाकर चांदणे, दलित मित्र कवी साबळे गुरुजी, संगमप्पा धांडोरे, एडवोकेट मारुती ढाळे, युवक अध्यक्ष दीपक गोडसे, आनंदराव यमगर, कुंडलिक आलदर, संतोष देवकते, श्रीमंत सरगर, शहाजी गडहिरे, बापूसाहेब ठोकळे, सुबराव बंडगर सर , साहित्यिक संतोष जगताप, साहित्यिक योजनाताई मोहिते, नीलकंठ लिंगे सर, घेरडीच्या सरपंच सुरेखाताई पुकळे, आरतीताई जगधने, प्रा. डॉ. सौ सीमा गायकवाड, स्वातीताई मगर, पत्रकार तांबोळी, साहेब नीलकंठ लिंगे सर बाळू पाटील डॉक्टर पोपट कारंडे, एडवोकेट भारत बनकर, एडवोकेट धनंजय मेटकरी, एडवोकेट नाना ढेरे, रमेश जाधव, राजू मगर, बाळासाहेब झपके मनोज ढोबळे मधुकर गोरड सर, डॉ दगडू खरात, अनिल खरात, बयाजी लवटे, अशोक मोटे, नितीन खुळपे, शंकर जगधने, प्रा. डॉ. दत्ता डांगे ब्रह्मदेव खरात सर, प्रा. विजयकुमार घाडगे, प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा. संभाजी शिंदे, प्रा. डॉ. भूपाल पाटील, प्रा. डॉ. काकासाहेब घाडगे, प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे, कवी ज्ञानेश डोंगरे, कवी शिवाजी बंडगर विठ्ठल वलेकर सर, संजय वलेकर सर, गुरुजी, प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले प्रा. कामाजी नायकुडे, मारुती माने सर, बिरुदेव शिंगाडे, दत्तात्रय जानकर, धनंजय डोंगरे सर, दत्तात्रय जाधव, धर्मराज बोराडे साहेब, शंकर चौगुले, वसंत रुपनर, राजेंद्र देशमुख, हरिभाऊ येडगे, अशोक पाटील गुरुजी, संभाजी बुरुंगे, अंकुश बुरंगे गुरुजी, बाळासाहेब पुकळे, प्रा. बाळासाहेब कोकरे, प्रा. नारायण आदलिंगे, प्रा. बाळासाहेब सरगर, प्रा, धनाजी भानवसे, प्रा. पांडुरंग लवटे, नवनाथ कांबळे सर, प्रा. अशोक वाकडे प्रा. अविनाश लोखंडे, ज्ञानेश्वर भोसले बिभीषण सावंत चंद्रकांत देवकते सर दत्ता खांडेकर आदी सांगोला तालुक्यातील अनेक मान्यवर, साहित्यिक रसिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका