खा. निंबाळकर व आ. सुभाष देशमुख यांच्या भेटीत संघटनात्मक बाबींवर चर्चा
सोलापूर येथे झाली भेट
माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी नुकतीच आ. सुभाष देशमुख यांची भेट घेत जिल्ह्यातील संघटनात्मक बाबींवर चर्चा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपा नेते संतोष पाटील आदी उपस्थित होते.
खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी लोकमंगल बँकेत जाऊन गणेशाचे पूजन करून आरती केली. यावेळी आ. देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीबद्दल सविस्तर चर्चा करून आ. देशमुख यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच नव्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी खा. निंबाळकर आणि आ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात भाजप आणखी मजबूत करणार असल्याचे सांगितले.