खड्डे बुजविणे ही धूळफेक, रासप करणार आंदोलन

सोमा (आबा) मोटे यांचा इशारा

Spread the love

आज तालुक्यातील 50 किलोमिटरच्या रस्त्यावरील खड्डे बुजविल्याची शक्यता आहे. पण ज्या दिवशी खड्डे बुजविले त्याच्या दुसऱ्या दिवशी खड्डे उखडले गेले आहेत.

सांगोला / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील रस्ते खड्ड्यात हरवून गेले आहेत. सांगोला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालून रस्ते पूर्ववत करणे अपेक्षित असताना काही ठिकाणच्या रस्त्यात केवळ माती किंवा फुफाटा टाकून खड्डे बुजवण्याचे नाटक केले जात आहे. या प्रकरणी लवकरच आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोमा (आबा) मोटे यांनी दिला आहे.

सांगोला तालुक्यातून राष्ट्रीय व राज्य मार्ग गेलेले आहेत. याची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. पण तालुक्यातील डांबरीकरणाच्या रस्त्याकडे हा तालुक्यातील बांधकाम विभाग लक्ष देत नाही. त्यामुळे 120 किलोमिटरहून अधिक लांबीच्या रस्त्यांची वाट लागलेली आहे.

सध्या जी रस्त्याची कामे सुरू आहेत, त्यामध्येही गुणवत्ता नाही. असे हे प्रकार होत असताना, तालुक्याचे लोकप्रतिनिधीही गप्प आहेत. त्यामुळे तालुकावासियांना अनंत अडचणींना तोंड देत प्रवास करावा लागत आहे.

आज तालुक्यातील 50 किलोमिटरच्या रस्त्यावरील खड्डे बुजविल्याची शक्यता आहे. पण ज्या दिवशी खड्डे बुजविले त्याच्या दुसऱ्या दिवशी खड्डे उखडले गेले आहेत. विशेष म्हणजे या विभागाचा एकही कर्मचारी या कामावर आढळून आला नाही. याच कामाबाबत उपअभियंत्याकडे विचारणा केली पण, हे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत.

सोमा आबा मोटे

खरे तर तालुकाभरातील रस्त्यांची वाट ही सार्वजनिक बांधकाम विभागानेच लावली आहे. आता रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची जी मोहीम सुरू आहे, ही निव्वळ धूळफेक आहे. खड्डे बुजविण्याच्या दुसऱ्यादिवशी खड्डे उकरतात, हे सारे कश्याचे गमक आहे? या विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहे. तर 1 जानेवारी 2022 रोजी यातील खड्ड्यात वृक्षारोपणही करणार आहे. – सोमा (आबा) मोटे, रासप, जिल्हाध्यक्ष, सोलापूर)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका