क्रूर अन्यायाविरुद्ध माझं मूक राहणं हीसुद्धा हिंसाच असेल!

डॉ. सुनील अभिमान अवचार यांचा विशेष लेख

Spread the love

 

डॉ. सुनील अभिमान अवचार आंबेडकरवादी कवी-चित्रकार असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ‘ग्लोबल वर्तमानाच्या कविता’, ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ’ आणि ‘Our WORLD is Not SALE’, ‘We, the Rejected People of India’ हे अनुवादित काव्यसंग्रह प्रसिद्ध असून ते सातत्याने आपल्या कला आणि साहित्यातून शोषणअंताची भूमिका घेत आहेत.

मी एक संवेदनशील कवी-चित्रकार म्हणून गांधींच्या तीन माकडांसारखा बहिरा, मूका, डोळे मिटलेला कसा असू शकतो? मी डॉ. आंबेडकरांच्या चष्म्यातून माझा भवताल पाहत असतो, प्रतिक्रिया देत असतो. चित्रांचा व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे माध्यम म्हणून उपयोग करीत असतो.

हाथरस प्रकरण जेव्हा घडत होते, तेव्हा माझ्यातला संवेदनशील चित्रकार अस्वस्थ होत होता. चित्रांच्या माध्यमातून सोशल मीडियावर बोलत होता. शोषण व्यवस्थेच्या सर्वात खालच्या पायदानवर उभ्या असलेल्या माझ्या दलित बाईच्या प्रश्नांविषयी, तिच्या वेदनेविषयी बोलत होता. मागे खैरलांजीमध्ये ही आणि अशाच प्रकारची स्मशान शांतता आपण अनुभवली. तसेच हाथरस केसमध्ये ही पुन्हा घडत होते. मला प्रश्न पडत होता ‘why Dalits Daugter cannot be Indians Daughter?’ याच काळात हत्तींनीच्या पिल्लाविषयी हळहळ व्यक्त करणारा समाज दलित बाईविषयी का मुका होता? दलित बाईचा प्रश्न जनावरांपेक्षा खालचा आहे का ?. ‘Shame on casteist media and savarna feminism’, ‘Whery is candle march?’

आजही मुक्ता साळवे यांनी मांडलेल्या ‘मांग-महारांच्या दुःखाविषयी’ निबंधातील वेदना तिच्या पाचवीला पुजली आहे. खरे तर, ’10 dalit women raped every day in india.’ दलित स्त्रीला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा किमान हक्क नाही का? तिचा तिच्या शरीरावर मृत्यू झाल्यानंतरही हक्क नाही का ? का तिचं शरीर मध्यरात्री कचरा जाळल्यासारखं ‘dispose’ केलं जातं ? का तिला निर्भयासारखी ‘Singpore’ची आधुनिक ‘treatment’ मिळत नाही? या आणि अशा कारणांसाठीच दलित स्त्रीचा ‘stand’ हा वेगळा आहे.

शोषणाच्या प्रत्येक संस्थेत दलित महिला ही ‘receiving end’ला आहे. हाथरससारख्या घटनेनंतर फुलनदेवीची आठवण येते, इथल्या जातीय व अमानुष, मानवी प्रेम, मैत्री आणि करुणा या भावना मारून टाकलेल्या समाजात फुलनदेवी परत व प्रत्येक स्त्रीत जन्माला यावी असं वाटते. जेव्हा कायद्याचा धाक (Rule of Law) निष्प्रभ होऊ लागतो तेव्हा फुलनसारखी प्रवृत्ती निर्माण होणे साहजिकच असते. स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतरही दलित स्त्रीचं शरीर हे ‘consumable’ म्हणून पाहिलं जातं.

या सगळ्यांची मुळं इथल्या जातीव्यस्थेत असून ती खिळखिळी करण्यासाठी मी माझ्या चित्रांमधून जात-व्यवस्थेतून निर्माण होणारं शोषण दाखवत असतो. माझी आंबेडकरवादी जाणीव त्याला मुक्तीवादी राजकारणाची दिशा देते आणि ब्राह्मणी व्यवस्थेतून निर्माण होणाऱ्या शोषणाला नाकारुन स्वातंत्र, समता आणि बंधुता या सार्वत्रिक मानवी मूल्यांचा पुरस्कार करते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका