कोळा येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
जि.प. सदस्य, अॅड. सचिन देशमुख यांची माहिती
- सीईओ दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह ८ पत्रकारांचा होणार सन्मान
सांगोला : डॉ. नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा विक्रमवीर आमदार कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ सोमवार, १ नोव्हेंबर रोजी कोळा येथे सीईओ दिलीप स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व अन्य मान्यवरांचा, ८ पत्रकारांचा ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक जि.प. सदस्य तथा अॅड. सचिन देशमुख यांनी ‘थिंक टँक लाईव्ह’शी बोलताना दिली.
कोळा येथे कोरोना योद्धा पुरस्कार व सन्मान सोहळा
कोळा (ता.सांगोला) येथे १ नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता अॅड. अशोकराव देशमुख युवा व क्रीडा मंच, कोळे यांच्यातर्फे कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ व ‘सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. तुलसी मल्टीपर्पज हॉल, कोळा येथे हा कार्यक्रम होईल. जि.प. सदस्य तथा अॅड. सचिन देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. याच कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात येणार आहे.
योद्धा पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे सत्कारमूर्ती
श्री. दिलीप स्वामी (जि.प. मुख्य कार्यकारी)
श्री. मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी)
श्री. डॉ. शितलकुमार जाधव (जिल्हा आरोग्य अधिकारी)
सौ. चंचल पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., सोलापूर)
श्री. अभिजित पाटील (तहसीलदार, सांगोला)
श्रीमती राजश्री पाटील (पोलीस उपअधिक्षक, मंगळवेढा)
श्री. सुहास जगताप (पोलीस निरीक्षक, सांगोला)
श्री. जावेद शेख (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर)
डॉ. सीमा दोडमणी (तालुका वैद्यकीय अधिकारी, सांगोला)
श्री. संतोष राऊत (तत्कालीन गटविकास अधिकारी)
सांगोलातील ८ पत्रकारांचा होणार सन्मान
सांगोला तालुक्यात कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या आठ पत्रकारांचा यावेळी जिल्हाधकारी मिलिंद शंभरकर व जि. प. सीईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्काप्राप्त पत्रकार खालीलप्रमाणे.
१) डॉ. बाळासाहेब मागाडे
२) दत्तात्रय खंडागळे
३) अरुण बोत्रे
४) अमेय मस्के
५) डॉ. नाना हालंगडे
६) किशोर म्हमाणे
७) अरुण लिगाडे
८) राजेंद्र यादव
कोळा जि.प. गटातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान
कोरोना काळात कोळा जिल्हा परिषद गटामध्ये कोरोना निर्मुलनासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जि.प. गटातील आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, सफाई कामगार, तलाठी, पत्रकार, पोस्टमन, पोलीस कर्मचारी, शिक्षक यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.