कोरोनाने धडकी भरवली! १ लाखावर नवीन रुग्ण
ओमिक्रॉनने घेतला दुसरा बळी
Omicron चा धोका वाढत असला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. मास्क व लस हा यावरील रामबाण उपाय आहे. कोरोणा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे.
थिंक टँक न्यूज नेटवर्क (नाना हालंगडे)
देशात करोनाची तिसरी लाट सुरू ( covid cases in india ) झाली आहे. सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी आकडेवारी तिसरी लाट सुरू झाल्याचे दर्शवत आहे. देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही (Omicron Reports First Death In Odisha ) वेगाने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १ लाख १७ हजार १०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ३०२ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ३००७ इतकी झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशात आता करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख ७१ हजार ६३ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ३० हजार ८३६ जण करोनामुक्त झाले आहेत.
देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचे ३००७ रुग्ण
देशात ओमिक्रॉनचे आतापर्यंत ३००७ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ११९९ रुग्ण बरेही झाले आहेत. देशात ओमिक्रॉनचा संसर्ग असलेल्या राज्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमिक्रॉनच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
ओमिक्रॉनमुळे देशात दुसरा मृत्यू
करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रनने देशात दुसरा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ओडिशाच्या बालनगीर जिल्ह्यात एका ५० वर्षीय महिलेचा ओमिक्रॉनच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. ओडिशात ओमिक्रॉनने हा पहिला ( Omicron Reports First Death In Odisha ) मृत्यू नोंदवला गेला आहे. तर हा देशातील दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका वृद्धाचा ओमिक्रॉनच्या संसर्गाने मृत्यू झाला होता.