कोरोनानंतर प्रथमच भारताचा तिरंगा आफ्रिकेतील किलीमांजारोवर फडकला

अनलॉक फेजमध्ये आयुष खरे याची अभिमानास्पद कामगिरी 

Spread the love

 

कोरोनानंतर जागतिक स्तरावर गिर्यारोहण करणारी 360 एक्सप्लोरर पहिली भारतीय टीम.

सोलापूर/ अशोक कांबळे : 360 एक्सप्लोरर मार्फत विक्रमवीर आनंद बनसोडे याने भारत-टांझानिया या देशातील एअर-बबल फ्लाईटचा फायदा घेत आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराची मोहिम आयोजित करत आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवून विक्रम प्रस्थापित केला आहे. कोरोनानंतर प्रथमच 360 एक्सप्लोररच्या आयुष खरे याने आनंद बनसोडे याच्या मार्गदर्शनाखाली आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारोवर तिरंगा फडकवत कोरोनानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय मोहीम यशस्वी करण्याचा मान मिळवला आहे. ही मोहीम आंतरराष्ट्रीय टुरिझम क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असून टुरिझम क्षेत्रातील प्रत्येकासाठी ही मोहीम समर्पित असणार आहे असे आनंद बनसोडे यांनी सांगितले. कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर गिर्यारोहण करणारी 360 एक्सप्लोरर ही पहिली भारतीय कंपनी बनली असून टांझानिया येथील अल्फान्सो कोसिको यांनी याबाबत 360 एक्सप्लोरर चे कौतुक केले आहे.नुकतेच 360 एक्सप्लोरर ला “स्टार्ट-अप इंडिया” चे नामांकन मिळाले असून भारतातील जवळपास 4,50,000 रजिस्टर स्टार्ट-अप पैकी फक्त 40,000 कंपन्यांमध्ये 360 एक्सप्लोरर ने हे यश मिळवले आहे.


किलीमांजारो मोहीम

आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून 19,341फूट आहे.  अतिशय खराब वातावरणात शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण, पडणारा बर्फ या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी पायथ्यापासून 1 डिसेंबर रोजी सुरवात केली होती. 5 डिसेंबर रोजी भारतीय प्रमानवेळेनुसार दुपारी 12.10 वाजता ही मोहीम फत्ते केली. कोरोनाबाबत सर्व काळजी 360 एक्सप्लोरर मार्फत घेत ही मोहीम पूर्ण केली गेली.

-काय आहे एअर बबल फ्लाईट

कोरोना नंतरच्या जागतिक अनलॉक मोहिमेत प्रत्येक देशाने खबरदारी घेत आपापल्या देशातून विशिष्ट देशांसाठी फ्लाईट्स सुरू केल्या आहेत. काही निवडक आंतरराष्ट्रीय विमाने सुरू करतानाही अनेक नियमांचा विचार केला गेला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये टांझानिया देशासाठी भारताने एअर-बबल फ्लाईट सुरू केली होती. लगेच 360 एक्सप्लोरर मार्फत अशी निवडक असलेली फ्लाईट बुक करून ही मोहीम आयोजित केली गेली होती.

ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची मोहीम होती. शेवटच्या चढाईवेळी कमी तापमानात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत ही चढाई पूर्ण केली आहे. कोरोना नंतर प्रथम भारतीय तिरंगा फडकताना अभिमान वाटत होता. 360 एक्सप्लोरर व आनंद बनसोडे यांच्या मार्फत ही मोहीम अगदी व्यवस्थित आयोजित केली गेली होती. कोरोनानंतरच्या या मोहिमेसाठी सर्व काळजी घेतली गेली आहे. – आयुष खरे

आंतरराष्ट्रीय स्तरावर गिर्यारोहण किंवा टुरिझम सुरू करणारी पहिली भारतीय कंपनी बनण्याचा मान 360 एक्सप्लोरर ला मिळतो आहे याचा भरपूर अभिमान वाटतो आहे. नुकतेच “स्टार्ट-अप इंडिया” चे 360 एक्स्प्लोरर ला नामांकन मिळाल्यामुळे खूप आनंद वाटत आहे. इथून पुढे अशाच मोहीमा करून सर्वांसाठी अभिमानास्पद कामगिरी करण्याचा मानस आहे. – एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे (360 एक्स्प्लोरर)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका