कीर्तनातून प्रबोधन करणारी नवदुर्गा Think Tank Live
ह. भ. प. सुप्रियाताई बिरा बंडगर यांची यशोगाथा
आजचा रंग : पिवळा
सांगोला / डॉ. नाना हालंगडे
नवरात्र म्हणजे देवीच्या नऊ रुपांचा जागर, त्यांचे नमन करतानाच आजच्या काळात या रूपांना अनुसरून कार्य करणाऱ्या आधुनिक स्त्रीशक्तीच्या कर्तत्वाचा हा जागर. असाच जागर सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी येथील कुमारिका सुप्रिया बंडगर करीत आहेत.
कुमारिका सुप्रिया बंडगर यांनी वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे 2010 मध्ये घेरडी गावातील भोजलिंग महाराज यांच्याकडून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली आणिि
“म्हणोनी जाणतेनि गुरु,
भजिजे जेने कृतकार्य,
होईजे जैसे मूळ सिंचने सहजे,
शाखापल्लव संतोषती”
या संताच्या अभंगाप्रमाणे कुमारिका सुप्रिया बंडगर यांनी आचरण करावयाचे ठरविले. त्या अध्यात्मात इतक्या तल्लीन झाल्या की, कुटुंबाबरोबर गावचे नाव त्यांनी उज्वल केले. अशाच या कुमारिका हभप सुप्रियाताई बंडगर सर्वांसाठी प्रेरणादायी ठरल्या.
जीवनामध्ये गुरु हाकेला पाहिजे, आपलं जीवन सद्गुरु शिवाय सदगतीत आहे. म्हणून भोजलिंग महाराज यांना गुरु करून घेतले आणि शालेय शिक्षणाबरोबरच अध्यात्माची जोड मिळाली आणि खऱ्या अर्थाने व खऱ्या जीवनाची वाटचाल सुरू झाले दोन वर्ष संप्रदायामध्ये राहून पंढरीची वारी करत किर्तन भजन करत 23 वर्षाच्या अनुभवानंतर आई-वडिलांच्या मार्गदर्शनातून गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज गुरुवर्य स्वप्निल महाराज यांच्या मार्गदर्शनाने तुकाराम महाराज पहिल्या वयाच्या तेराव्या वर्षे म्हणजे सातवीमध्ये शिकत असताना साक्षात भगवंताच्या प्रांगणामध्ये म्हणजेच पंढरपूर येथे भोजलिंग महाराजांच्य मठामध्ये करण्याचा योग आला. आणि पहिलं कीर्तन विठ्ठल रुक्मिणी मंदिर तरंगेवाडी येथे केले आणि इथून पुढे गावोगावी किर्तन प्रवचन लागले.
जवळा, घेरडी, नाझरा, शिंदेवाडी, पारे, डिकसळ, हंगिरगे, सोरडी, आगलावेवाडी, वाकी, वाणीचिंचाळे अशा अनेक गावांमध्ये किर्तन केले आणि प्रत्येक गावातून किर्तनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. गावोगावी कीर्तन करायला घरच्यांनी सुद्धा पाठिंबा दिला म्हणून हे शक्य झाले. हळूहळू बाहेरच्या जिल्ह्यामध्येही कीर्तन करायला सुरुवात केली. अशाप्रकारे 2016 मध्ये मंगळवेढा येथे नितीन सावंत गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते राष्ट्रजागृती वारकरी परिषद सांगोला तालुका अध्यक्ष हे पद मिळाले. त्याचबरोबर जवळा येथे सामाजिक कार्य करण्यासाठी हेतून आदर्श कीर्तनकार म्हणून सामाजिक पुरस्कारही माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते मिळाला.
सावे बामणी अशा अनेक गावांमध्ये एक आदर्श कीर्तनकार म्हणून गौरविण्यात आले. अशाप्रकारे आजपर्यंत जवळ जवळ 500 हून अधिक कीर्तन केलेले खऱ्या अर्थाने जेव्हापासून या क्षेत्रात आले तेव्हापासून जीवनाला एक वेगळच वळण निर्माण झालं. आनंदमय जीवन होऊन गेले. जीवनामध्ये एक महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण मी किर्तन करावं. माझ्या वडिलांनी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा रहावं, माझ्या आजोबांनी विणा घेऊन उभा रहावं, आईने, आजीने समोर बसून ऐकाव. भाऊ- बहिणीने कीर्तनात टाळ वाजवावा आणि मी किर्तन करावं. याच्यापेक्षा कोणतीच गोष्ट आनंदाची गोष्ट नाही. म्हणून आज माझं हे जे काही सगळं श्रेय आहे ते मी माझे गुरुवर्य भोजलिंग महाराज माझे आई-वडील सर्व माझ्या परिवाराला देईन. खऱ्या अर्थाने मी वारकरी संप्रदायामध्ये आले आणि माझं सार्थक झालं असं मला वाटतं.
डॉक्टरी पेशा अध्यात्मात
हभप बिरा महाराज बंडगर हे पशुवैद्यक आहेत, मुक्या जनावरांच्या सेवेबरोबर त्यांना अध्यात्माची गोडी लागली. दणकेबाज आवाज, प्रचंड इच्छशक्ती, यामुळे यांनीही सेवा विस्तारली,अशातच बालवयात कन्या सुप्रियाला याची ही गोडी लागली, आज सुप्रियाताई कीर्तन म्हणजे सर्वासाठी पर्वणीच असते,यांच्या या ताफ्यामध्ये २५ लहान_ मोठी मुले मुली आहेत, याच डॉक्टरांनी अनेकांना अध्यात्मात आणणे आहे.