कीर्तनकार इंदुरीकर महाराज बुधवारी सोलापूरात
कुमठे प्रशालेच्या मैदानावर होणार कीर्तन
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
दिवाळीनिमित्त सोलापूरकरांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बुधवार, 10 नोव्हेबर रोजी सायंकाळी 6 वाजता कुमठे प्रशालेच्या मैदानावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन-तीन महिन्यांपासून इंदुरीकर महाराजांचे किर्तन घेण्याचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या नियमामुळे ते शक्य झाले नाही. त्यावेळी त्यांनी दिवाळीची वेळ दिली होती. त्यानुसार 10 नोव्हेबर रोजी कीर्तन कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जयकुमार माने यांनी केले आहे.
कोण आहेत इंदुरीकर महाराज
निवृत्ती काशिनाथ देशमुख (निवृत्ती महाराज व इंदुरीकर महाराज नावाने लोकप्रिय) आहेत. ते महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच ‘इंदोरीकर’चा ‘इंदुरीकर’ असा अपभ्रंश होऊन त्यांचे ‘इंदुरीकर महाराज’ असे नाव पडले.
समाजातील कू-प्रथांवर इंदुरीकर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून टीका करतात. इंदुरीकर महाराजांचे मुळ गाव इंदुरी ता.अकोले जि.अहमदनगर हे गाव अकोले पासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र ते सध्या ओझर ता.संगमनेर येथे राहतात.
इंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख या पण कीर्तनकार आहेत.
इंदुरीकर महाराजांना २ अपत्य आहेत. मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा. ज्या प्रमाणे कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामधून भागवत धर्माचा प्रसार करत आहेत तशाच पद्धतीने ते दोघेही कीर्तनकार होणाच्या मार्गांवर आहेत. इंदुरीकर महाराज हे कोणतेही अडाणी व्यक्तिमत्व नसून ते उच्चशिक्षित आहेत. त्यांनी B.Sc B.Ed शिक्षण घेतले आहे व काही दिवस शिक्षक म्हणून सुद्धा काम केले आहे. इंदुरीकर महाराज्यांनी वयाच्या २२व्या वर्षी कीर्तन करायला सुरुवात केली. त्यांची एक शिक्षण संस्था आहे. माऊली सेवाभावी बहू उद्देशीय संस्था या शिक्षण संस्थेचा खर्च इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातूनच करत असतात.
विविध विधानावरून वादग्रस्त
इंदुरीकर महाराज हे विविध विधानावरून सतत वादग्रस्त असतात. कोरोना लस घेतली नाही व घेणार नाही हे विधान नुकतेच त्यांनी केले आहे.