किडझी वर्ल्ड स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात!
चिमुकल्यांनी हुतात्मा स्मृती मंदिर दणाणून सोडले

सोलापूर : विशेष प्रतिनिधी
जुळे सोलापूर येथील सुप्रसिध्द किडझी वर्ल्ड स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये पार पडले. गेली दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे शैक्षणिक उपक्रम घेता आले नाहीत. यावर्षी त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक उपक्रम मोठ्या उत्साहाने घेण्यात येत आहेत.
किडजी वर्ल्ड स्कूलचे यावर्षी सातवे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मेस्टा (एफ) संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरीश शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आलेे.
वेलकम …या सॉंगने स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली. ईतीसी हसी …मेरे सपनोंकी रानी… भूक लगी.. मेरे बंसी बजरिया.. गाण्यावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून स्मृती मंदिर दणाणून सोडले.
चल सर्जा चल राजा…या मराठी गाण्यावर .. तसेच गोलमाल व पुष्पा या सुपरहिट चित्रपटातील गाण्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या कलेचा आनंद मनमुराद लुटला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही प्रत्येकच गाण्यावर खूपच बहारदार नृत्याविष्कार सादर केला. त्याला पालकांनीही प्रत्येक गाण्यावर प्रचंड टाळ्यांच्या गजरानी दाद दिली.
विशेष म्हणजे महिला पालकांनीही आपली कला सादर करून या कार्यक्रमास रंगत आणली.
पालकांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हुतात्मा स्मृती मंदिर खचाखच भरले होते. बहुतांश पालकांना उभे राहूनच कार्यक्रम पहावा लागला.
या कार्यक्रमासाठी स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. स्नेहा पाटील मॅडम, श्री. सुभाष कदम व सर्व टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप पाटील सर यांनी मानले.
हेही वाचा