ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

काय झाडी .. काय डोंगार थेट एमपीएससीत!

Spread the love

सांगोल्याच्या शहाजीबापूंची ओळखच आता त्या वाक्यामुळे झाली आहे. यातच आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेमध्ये काय झाडी … काय डोंगर … काय हाटील या डॉयलॉगमुळे चर्चेत आलेले आमदार शहाजीबापू पाटील यांचा मतदारसंघ कोणता , असा प्रश्न आला आहे . त्याचीच कुजबुज आता राज्यभर सुरू झाली आहे.

थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या काय झाडी .. काय डोंगार .. सगळं ओक्के हाय .. या वाक्यानं राज्यातच नव्हे संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला आहे . मुख्यमंत्र्यांपासून ते राज्यातील सर्व मंत्र्यांच्या तोंडी “काय झाडी अन् काय डोंगार”चीच चलती दिसून येत होती. सोशल मीडियावरही या वाक्यानं चांगलाच जोर धरला होता. या वाक्यावर माध्यमांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या करून चांगलेच चर्चा घडवून आणली. आता हा डायलॉग थेट एमपीएससी परीक्षेत आल्याने शहाजीबापू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सांगोल्याच्या शहाजीबापूंची ओळखच आता त्या वाक्यामुळे झाली आहे. यातच आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेमध्ये काय झाडी … काय डोंगर … काय हाटील या डॉयलॉगमुळे चर्चेत आलेले आमदार शहाजीबापू पाटील यांचा मतदारसंघ कोणता , असा प्रश्न आला आहे . त्याचीच कुजबुज आता राज्यभर सुरू झाली आहे.

आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून करणारे शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पण विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी 1999 ची विधानसभा अपक्ष म्हणून लढवली. याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2004 ची विधानसभा काँग्रेसच्या तिकिटावर लढवली.

बापूंचा जलवा
शहाजी पाटील हे सांगोला विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. आपल्या एका कार्यकर्त्याला केलेला त्यांचा कॉल राज्यभर प्रचंड व्हायरल झाला होता. यातील ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओक्केमधी हाय..’ हे वाक्य आजही सर्वांच्या ध्यानात आहे.

विद्यार्थी चळवळीतून राजकारणात
सध्या शिवसेनेतून आमदार असलेल्या शहाजी पाटील यांचा राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या एनएसयुआय पासून झाली. या काळात ते शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी आंदोलनात सक्रिय होते. एनएसयुआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असा प्रवास करत त्यांनी आपल्या सक्रिय राजकारणाला सुरुवात केली.

1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना युवक काँग्रेसच्या कोट्यातून सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

कॉलेज जीवनापासून वक्तृत्वावर पकड
शहाजीबापू यांच्या डोक्यात कोणत्या गावात, कोणत्या भाषेत, काय बोलायचं स्क्रिप्ट तयार असते. याचा अनुभव त्यांच्या या ठरवून व्हायरल केलेल्या कॉलमध्ये येतो आहे, असे बोलले जाते. शहाजीबापू पाटील यांची कॉलेज जीवनापासून वक्तृत्वावर पकड आहे. आजपर्यंत ते फक्त दोनच निवडणुका जिंकले आहेत.

पण त्यांच्या सभांना मात्र कायम गर्दी होत आली आहे. आपल्या भाषणात गावरान भाषेत किस्से सांगत, अनेक दाखले देत ते श्रोत्यांचा टाळ्या-शिट्या मिळवत असतात.

गणपतराव देशमुखांचा पराभव
सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि गणपतराव देशमुख हे समीकरण संपूर्ण राज्याने पहिले आहे. 1962 पासून गणपतराव देशमुख सलग या मतदारसंघातून निवडून येत होते. पण शहाजी पाटील यांनी 1995 साली गणपतराव देशमुख यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला. फक्त 192 मतांनी ते निवडून आले होते.

1995 सालचा एक विजय सोडला तर शहाजी पाटील यांना सलग पराभवाला सामोरं जावं लागलं. 1995 नंतर 1999, 2004, 2009 असे सलग पराभव त्यांनी स्वीकारले.

राष्ट्रवादीत केला होता प्रवेश
आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून करणारे शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पण विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी 1999 ची विधानसभा अपक्ष म्हणून लढवली. याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2004 ची विधानसभा काँग्रेसच्या तिकिटावर लढवली.

सलग चारवेळा पचविला पराभव
शहाजी पाटील यांनी 2014 च्या विधानसभेपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. पण तरीही त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यांनतर शहाजी पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकीमुळे भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा असताना युतीच्या वाटपात जागा शिवसेनेला सुटल्यामुळे 2019 विधानसभा ते शिवसेनेच्या चिन्हावर लढले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी गणपतराव देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांच्याशी त्यांची लढत झाली त्यात ते विजयी झाले.

फक्त 674 मतांनी विजयी
सलग चार पराभव पचवल्यानंतर 2019 मध्ये ते फक्त 674 मतांनी विजयी झाले. 1990 पासून आजपर्यंत तब्ब्ल सात निवडणुका लढवून शहाजी पाटील यांना फक्त दोनदा विजय मिळवता आला आहे आणि त्यांचे दोन्ही विजय निसटते आहेत.

1995 मध्ये फक्त 192 तर 2019 मध्ये फक्त 674 मतांनी त्यांना विजय मिळवता आला आहे. त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.


हेही वाचा

सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार मुलांना लागले चष्मे

जवळ्यातील ‘भारत’च्या कार्याला सलाम

सांगोल्यात आबांच्या साथीने बापूंचे राजकारण

शेकापच्या ४५ सरपंचांचा शहाजीबापूंवर संताप, कामात खोडा घालत असल्याचा आरोप

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका