कामावर हजर व्हा; अन्यथा सेवा समाप्त

एस.टी. महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटीस

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी आता एसटी महामंडळ सरसावले आहे. एसटी महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या 300 ते 350 कामगारांना सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कामगारांनी 24 तासांच्या आत नोकरीवर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आपली तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक रद्द करण्यात येईल असे या नोटिसीत म्हटले आहे.

एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

महामंडळाने आतापर्यंत एकूण 2,178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस.टी. कर्मचारी संघटनेचे नेते अजयकुमार गुजर यांनी उच्चस्तरीय समितीसमोर आपल्या संघटनेची बाजू आज राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलेल्या या बैठकीतही संपाबाबत तोडगा निघाला नाही.

28 युनियन आहेत ,कुणाशी बोलायचं?
‘एसटी कामगारांच्या 28 युनियन आहेत. त्या युनियनचे प्रतिनिधी सरकारला भेटून चर्चा करतात. त्यांच्या अनेक मागण्या मार्गीही लावल्या. मात्र ते पुन्हा चर्चेसाठी येत नाहीत. लाखो कामगार आहेत. त्या प्रत्येकाशी चर्चा शक्य नाही. युनियनचे कोण कोणाला ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीत कोणाशी बोलायचे ते सांगा,’ असा सवाल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना केला आहे. एसटी कामगारांच्या संपाबाबत पत्रकारांशी बोलताना अनिल परब म्हणाले, एसटी कामगारांचा संप 15 दिवसांनंतरही सुरूच आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार आज कामगारांच्या प्रतिनिधीने मुख्य सचिवांच्या समितीसमोर आपले म्हणणे मांडले. याबाबत अभ्यास करून समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करेल. त्यानुसार एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा पुढील निर्णय घेतला जाईल. याव्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर सरकारची दारे चर्चेसाठी खुली आहेत.

कोणी पुढे येऊन हमी घेत असेल तर त्याच्याशीही बोलण्याची तयारी
एसटी कामगारांच्या सर्व प्रतिनिधींची कृती समिती तयार झाली होती. त्यातील प्रत्येकाशी चर्चा केली. काही प्रश्न सोडवले. 28 युनियनच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतरही त्यांना मान्य नसेल तर कामगारांनी आपले प्रतिनिधी नेमून द्यावेत. जे कोणी कामगार बोलायला येतात ते चर्चा करतात, जातात आणि परत येत नाहीत. 28 संघटनांच्या युनियनलाही कामगार मानायला तयार नाहीत. त्यामुळे कोणी पुढं येऊन हमी घेत असेल तर माझी कोणाशीही बोलायची तयारी आहे,’ असंही परब यांनी स्पष्ट केलं.

आ. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे येऊन भेटून गेले. ते कामगारांशी बोलून कळवतो असे म्हणाले. सध्या कामगारांचं नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा चर्चा केली. सरकारचा दोन्ही वेळचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. कामगारांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो असे सांगून ते गेले, पण पुढं काहीच झालेलं नाही. कदाचित कामगार त्यांचेही ऐकत नसावेत किंवा ते कामगारांना समजावण्यात कमी पडत असतील,’ असे अनिल परब म्हणाले.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना इशारा
एसटीमध्ये सध्याच्या घडीला 1200 ते 1500 रोजंदारी कामगार आहेत. या कामगारांनी कामावर यायला हवं अशी आमची अपेक्षा आहे, पण तेही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहोत. उद्या ते कामावर येतात की नाही पाहिले जाईल. अन्यथा, पुढे काय कारवाई करायची तो निर्णय घेतला जाईल, असे अनिल परब म्हणाले.

संपाचे 10 दिवस
एसटी चा मागील 10 दिवसांपासून सुरू आहे,पण अद्यापपर्यंत यावर तोडगा निघालेला नाही. आता तर नव्याने भरती केलेल्या साडे तीन हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्यासाठी उक्ती शोधलेली आहे. आत्ता सोमवार 22 नोव्हेंबर पासून शाळा सुरू होणार असून याचा मोठा फटाका शाळांना बसणार आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका