काबूल विमानतळावर साखळी बॉम्बस्फोटात ६० ठार
मृतांत अमेरिकेचे १२ सैनिक, अफगाणिस्थानात धगधग
वॉशिंग्टन (विविध वृत्तसंस्थांच्या सौजन्याने) : तालिबान्यांनी अफगाणिस्थानवर कब्जा केल्यानंतर गुरुवारी प्रथमच आपले खरे रूप दाखवून दिले. अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबूल विमानतळावर (Kabul Airport) गुरुवारी एका मागोमाग एक असे तीन बॉम्बस्फोट झाले. याची जबाबदारी आयएसआयएस दहशतवादी संघटनेने घेतली अाहे. या हल्ल्यात 12 अमेरिकी सैनिकांसह 60 लोकांचा मृत्यू झाला.

तीन बॉम्बस्फोटात 60 ठार
काबूल विमानतळावर गुरुवारी सायंकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. यामध्ये 12 अमेरिकी सैनिक ठार झाले. गुरुवारी रात्री उशिरा अमेरिकी अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. यामध्ये 11 मरीन आणि एक नेव्हीचा सैनिक आहे. तर 15 सैनिक जखमी झाले आहेत. सुरुवातीला 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले होते. मात्र, नंतर हा आकडा 60 पर्यंत वाढला. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास आणखी एक बॉम्बस्फोट झाला आहे.
अमेरिका चवताळली
गुरुवारी झालेल्या तीन बॉम्बस्फोटात अमेरिकेचे 12 सैनिक ठार झाल्याने अमेरिका चवताळली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही, शोधून त्याची शिक्षा त्यांना देऊ, असा इशारा दिला आहे.
हेही वाचा : राज ठाकरे, राष्ट्रवादी आणि जातीयवाद
कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोसही आवश्यकच : डॉ. सायरस पुनावाला