ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारणशेतीवाडी
Trending
काँग्रेस आणि शरद पवारांना ओळखणारा माझ्याएवढा राज्यात दुसरा नेता नाही
ठाकरे गट-वंचितच्या हातमिळवणीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शिवसेना आणि वंचित यांच्यात युती होणार, हे नक्की आहे. शिवसेना पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये असल्यामुळे त्यांना सोबत घेतल्यानमंतर भाजपाविरोधातील लढाई सोपी जाईल, असे त्यांना वाटते. निवडणुका जोपर्यंत घोषित होणार नाहीत, तोपर्यंत उद्धव ठाकरे त्या दोन्ही पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतील,”
थिंक टँक : नाना हालंगडे
“उद्धव ठाकरे यांनी युतीचा अंतिम निर्णय घ्यायचा आहे. महापालिका निवडणुकीमध्ये आमची युती झालेली आहे. मात्र ती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. आम्ही एकमेकांना शब्द दिलेला आहे. आम्ही चार भिंतीच्या आत हे शब्द दिलेले आहेत. आता ही युती कधी जाहीर करायची ते उद्धव ठाकरे यांनी ठरवायची आहे. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सोबत घ्यायचे आहे. आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ, असेही त्यांनी सांगितलेले आहे. मी काँग्रेसला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. माझ्याएवढा काँग्रेस आणि शरद पवार यांना चांगल्या प्रकारे ओळखणारा राज्यात दुसरा नेता नाही. ते तुम्हाला फसवतील. शिवसेनेने थांबू नये, असा संदेश आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेला आहे,” असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी तसेच उद्धव ठाकरे गट यांच्यात युती झाल्याचे म्हटले जात आहे. युती झालेली असून आम्ही आगामी निवडणुका सोबत लढणार आहोत, असे वंचितच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. दरम्यान, एकीकडे या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आले होते. दरम्यान, या भेटीबाबत खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक भेटीत राजकीय विषय नसतो, असे आंबेडकर म्हणाले.
भाजपाविरोधातील लढाई सोपी जाईल
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शिवसेना आणि वंचित यांच्यात युती होणार, हे नक्की आहे. शिवसेना पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासोबत सरकारमध्ये असल्यामुळे त्यांना सोबत घेतल्यानमंतर भाजपाविरोधातील लढाई सोपी जाईल, असे त्यांना वाटते. निवडणुका जोपर्यंत घोषित होणार नाहीत, तोपर्यंत उद्धव ठाकरे त्या दोन्ही पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतील,”
त्यांनी भाजपाला सोडले तर आमच्यात राजकीय चर्चा होऊ शकते
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, “सध्या सगळीकडेच संभ्रमाची स्थिती आहे. आमचा शिवसेनेसोबत (उद्धव ठाकरे) जाण्याचा विचार आहे. आपण या चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर सांगू, असा आम्ही त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला होता. आता युती कधी जाहीर करायची हे शिवसेनेने ठरवायचे आहे. ही युती जोपर्यंत जाहीर होणार नाही, तोपर्यंत अनेक तर्क लावले जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत भेट होणारच आहे. मात्र प्रत्येक भेट ही राजकीय आहे, असा विचार करणे चुकीचे आहे. त्यांनी भाजपाला सोडले तर आमच्यात राजकीय चर्चा होऊ शकते. अन्यथा नाही.”