ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे : शिक्षण क्षेत्रातील संत

डॉ. श्रीमंत कोकाटेंचा जयंतीनिमित्त विशेष लेख

Spread the love

मामा प्रागतिक विचारांचे होते. ते स्त्री स्वांतंत्र्याचे पुरस्कर्ते होते, ज्या काळात पाटील-देशमुखांच्या मुलींना घराबाहेर पडायला बंदी होती, त्या काळात मामांनी मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृह आणि शाळा सुरू केली व त्यांना शिक्षण दिले.

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी 1934 साली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या या संस्थेच्या आज अनेक शाखा आहेत. सुमारे दहा महाविध्यालंय 50 ते 60 शाळा आहेत. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांना केंद्रबिंदू मानून स्थापन झालेल्या या संस्थेतील असंख्य विध्यार्थी आज जगातील वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत.

मामा स्वतः शेतकरी होते. ते आजन्म वारकरी होते, कारी हे त्यांचे गाव. पण टाळ मृदंगाच्या तालावर पंढरीची वारी करण्यापेक्षा संत तुकारामांनी सांगितलेल्या

*आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने।
*शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू।।

मामांच्या छत्रछायेखाली वाढलेली मुलं नावारूपाला आली. डॉ. बी. वाय यादव, प्रा. सी. बी. शितोळे, दिवंगत आमदार प्रा. शैलजाताई शितोळे, डॉ. गुलाबराव पाटील, वायूपुत्र नारायणराव जगदाळे इत्यादी ही कांही उदाहरणं आहेत. मामांच्या या अलौकिक कार्याबद्धल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापीठाने त्यांना डि.लिट. पदवी देऊन सन्मानित केले.

या विचारांचे त्यांनी पालन केले. ते बालवयात आळंदीला गेले. तेथेच नामस्मरण करीत आयुष्य विठ्ठल चरणी समर्पित करायचे, हा त्यांचा मानस होता, परंतु त्यांच्या बहिणीने विरक्तीपासून त्यांना दूर केले. मामा बालपणापासूनच करारी, दृढनिश्चयी आणि तितकेच कनवाळू होते. त्यांनी गावी गेल्यावर पाहिले तर गरिबांची प्रचंड हालअपेष्टा आहे. शिक्षणात सनातन्यांची मक्तेदारी आहे. सामान्य जनतेला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी बार्शीत शिवाजी बोर्डिंग आणि शिवाजी शिक्षण संस्था सुरू केली. त्यांनी स्वतःची संपत्ती संस्थेला दान दिली. मामा सुरुवातीला कांही काळ बार्शी नगरपालिकेत अधिकारी होते. राजीनामा देऊन मिळालेला पैसा गरिबांच्या शिक्षणासाठी दिला. मामा श्रीमंत कुटुंबातून आलेले होते, पण गरिबात राहिले, गरिबांसोबत जेवले आणि शेवटपर्यंत गरिबांसाठी झिजले.

मामा स्वतः संस्थेच्या शिवाजी बोर्डिंगमध्ये राहत. मुलांसोबत जेवत. जे बोर्डिंगमधील मुलांना जेवण असे, तेच जेवण मामा स्वतः जेवत. पंक्तीभेद मामाला आवडत नसे. मामांनी गावोगावी जाऊन मुलं आणि धान्य गोळा केले. घेणारे हात स्वच्छ असले की देणारे लाखो हात पुढे येतात, हे दोन कर्मवीरांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. कर्मवीर भाऊराव पाटील आणि कर्मवीर जगदाळे मामा!

दर्जेदार शिक्षणासाठी मामांनी गुणवान, अभ्यासू शिक्षक नेमले. त्यांनी पाहुण्यारावळ्याची खोगीरभरती केली नाही. ते स्वतः मुलाखत घेत असत. दर्जेदार शिक्षक नसतील तर पुणे, मुंबई, जळगाव, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद येथून बोलावून घेतले. मामांना दूरदृष्टी होती. वाशिल्यावर आणि पैशावर शिक्षक भरती त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे संस्थेतून अनेक गुणवान, कर्तृत्ववान विद्यार्थी घडले.

श्री. शिवाजी कॉलेज, जिजामाता विध्यामंदिर, महात्मा फुले विध्यालय, राजर्षी शाहू लॉ कॉलेज, शंकरराव निंबाळकर डी. एड. कॉलेज, संत तुकाराम विध्यालय, महाराष्ट्र विध्यालय इत्यादी शाखातून ज्ञानदानाचे काम चालते. क्रान्तीसिंह नाना पाटील यांनी इमारतीचे भूमिपूजन केले होते. मामांनी त्यांना स्वातंत्र्यचळवळीत खूप मोठी साथ दिलेली होती. मामा पुरोगामी विचारांचे होते. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचा आग्रह होता.

गरिबांसाठी अत्याधुनिक हॉस्पिटल असावे, ही त्यांची इच्छा होती. ते स्वप्न त्यांनी अविरत कष्टाने पूर्णत्वास नेले. बोर्डिंगमधील विध्यार्थ्यानी श्रमदानातून इमारत उभारली. बार्शीत आज अत्याधुनिक आणि स्वस्त असे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल उभा आहे. एखाद्या उपचारासाठी पुण्यात एक लाख रुपये खर्च येत असेल, तर या हॉस्पिटलमध्ये फक्त सुमारे वीस हजार रुपये खर्च येतो. मामांच्या विचाराने कामकाज चालते.

स्वातंत्र्य लढ्यात मामांचा मोठा वाटा आहे. त्यांनी अनेक क्रांतिकारकांना आश्रय दिला. क्रांतिसिंह नाना पाटील आणि मामा यांचे घनिष्ठ संबंध होते. मामांनी नानांच्या हस्ते महाराष्ट्र विद्यालयाचे उदघाटन केले. शिवाजी महाविद्यालयाच्या समोर असणाऱ्या भव्य मैदानाला “क्रांतिसिंह नाना पाटील मैदान” असे नाव दिलेले आहे. मामांची स्वातंत्र्याबाबतची संकल्पना व्यापक होती. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय स्वातंत्र्य ही त्यांची व्यापक संकल्पना होती. त्यासाठी त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला.

मामांना शिवरायांबद्धल खूप अभिमान वाटे. त्यांनी शिवरायांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा संस्थेच्या प्रांगणात उभारला आहे. मामांनी शिवरायांची प्रेरणा घेवून तरूणाना आधुनिक विचार आणि आधुनिक शिक्षण दिले.

गरिबांसाठी अत्याधुनिक हॉस्पिटल असावे, ही त्यांची इच्छा होती. ते स्वप्न त्यांनी अविरत कष्टाने पूर्णत्वास नेले. बोर्डिंगमधील विध्यार्थ्यानी श्रमदानातून इमारत उभारली. बार्शीत आज अत्याधुनिक आणि स्वस्त असे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल उभा आहे. एखाद्या उपचारासाठी पुण्यात एक लाख रुपये खर्च येत असेल, तर या हॉस्पिटलमध्ये फक्त सुमारे वीस हजार रुपये खर्च येतो. मामांच्या विचाराने कामकाज चालते.

मामा प्रागतिक विचारांचे होते. ते स्त्री स्वांतंत्र्याचे पुरस्कर्ते होते, ज्या काळात पाटील-देशमुखांच्या मुलींना घराबाहेर पडायला बंदी होती, त्या काळात मामांनी मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृह आणि शाळा सुरू केली व त्यांना शिक्षण दिले. त्यांना अंधश्रद्धा मान्य नव्हत्या, ते विज्ञानवादी विचारांचे होते. मामांनी सुधारणावादी धोरणांना नेहमी आधार दिला. ते संत तुकाराम महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे कर्ते अनुयायी होते.

मामांच्या छत्रछायेखाली वाढलेली मुलं नावारूपाला आली. डॉ. बी. वाय यादव, प्रा. सी. बी. शितोळे, दिवंगत आमदार प्रा. शैलजाताई शितोळे, डॉ. गुलाबराव पाटील, वायूपुत्र नारायणराव जगदाळे इत्यादी ही कांही उदाहरणं आहेत. मामांच्या या अलौकिक कार्याबद्धल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विध्यापीठाने त्यांना डि.लिट. पदवी देऊन सन्मानित केले.

कर्मवीर डॉ. जगदाळे मामा यांना जनता आदराने मामा म्हणते. मामा हे भाच्याला लाडाने वागवतात, तसेच ते त्यांची योग्य जडणघडण करण्यासाठी कटिबद्ध असतात. मामा हे सर्वांचे मामा होते. मामा शिक्षण क्षेत्रातील संत होते. अशा त्यागी, पुरोगामी महामानवाच्या संस्थेचा मीही विध्यार्थी आहे, याचा मला अभिमान वाटतो. मामांची ४ फेब्रुवारीला जयंती असते. जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!

– डॉ.श्रीमंत कोकाटे


डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे गाजलेले लेख

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका