ओमिक्रॉनमुळे येऊ शकते तिसरी लाट?
कानपूरने आयआयटी दिला 'हा' इशारा
आयआयटी कानपूरने आपल्या अभ्यासात म्हटलं आहे. पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये करोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. आयआयटी कानपूरचा रिपोर्ट MedRxiv मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. करोनाच्या जगभरातील स्थितीची आढावा आणि कल घेतल्यानंतर आयआयटी कानपूरने रिपोर्ट म्हणून मोठा अंदाज व्यक्त केला आहे.
थिंक टँक न्यूज नेटवर्क / नाना हालंगडे
देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ३५० च्या वर गेली आहे. जवळपास १७ राज्यांमध्ये ओमिक्रनने एन्ट्री केली आहे. मध्य प्रदेशनंतर आता उत्तर प्रदेश सरकारनेही नाइट कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. यूपीत २५ डिसेंबरच्या रात्रीपासून कर्फ्यू लागू होणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू असणार आहे. तसंच लग्न समारंभ आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये २०० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच आता आयआयटी कानपूरने इशारा दिला आहे.
आयआयटी कानपूरने ओमिक्रॉनबाबत मोठा दावा केला आहे. भारतात फेब्रुवारीमध्ये पीकवर म्हणजे शिगेला पोहोचेल, असं आयआयटी कानपूरने आपल्या अभ्यासात म्हटलं आहे. पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये करोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांचा अंदाज आहे. आयआयटी कानपूरचा रिपोर्ट MedRxiv मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. करोनाच्या जगभरातील स्थितीची आढावा आणि कल घेतल्यानंतर आयआयटी कानपूरने रिपोर्ट म्हणून मोठा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतात डिसेंबरच्या मध्यापासून तिसरी लाट सुरू होऊ शकते. ही लाट पुढच्या वर्षात फेब्रुवारीच्या सुरवातीला शिगेला पोहोचू शकते, असं आयआयटी कानपूरने आपल्या अंदाजात म्हटलं आहे. तिसऱ्या लाटेचा अंदाज मांडण्यासाठी तज्ज्ञांनी गॉसियन मिक्स्चर मॉडेल नावाच्या एका सांख्यिकी पद्धतीचा उपयोग केला. भारतातील करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज काढण्यासाठी तज्ज्ञांनी देशातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील आकडे आणि वेगवगेळ्या देशांमधील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येचा उपयोग केला आहे.
या संबंधी अभ्यास करणाऱ्या आयआयटी कानपूरच्या टीममध्ये गणित आणि सांख्यिकी विभागाचे सबरा प्रसाद राजेशभाई, सुभरा शंकर धर आणि शलभ यांचा समावेश होता. देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ३५८ वर देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३५८ इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्रात एकूण रुग्णांची संख्या ही ८८ आहे. राजधानी दिल्लीत ६७, तेलंगण ३८, तामिळनाडू ३४, कर्नाटक ३१, गुजरातमध्ये ३०, केरळमध्ये २७, राजस्थानमध्ये २२, हरयाणा आणि ओडिशात प्रत्येकी ४, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ३, आंध्र प्रदेश, यूपीमध्ये प्रत्येकी २, आणि चंदीगड, लडाख आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे.