एसटी संप; “वो बुलाते है, मगर जानेका नही”

महाव्यवस्थापक म्हणतात, सोमवारपर्यंत हजर व्हा; कामगार संपावर ठाम

Spread the love

कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. “वो बुलाते है, मगर कॉल उठानेका, १३ तारीख को भी कामावर जानेका नही” असे गाण्याचे स्टेटस् अनेकांनी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवले आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क / नाना हालंगडे
एसटी महामंडळ महाव्यवस्थापकानी कामगारांना सोमवारपर्यंत हजर व्हा असे आदेश काढले आहेत. कामगार मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. “वो बुलाते है, मगर जानेका नही” असाच त्यांनी पवित्रा घेतला आहे. नव्हे तर या गाण्याचे स्टेटस् अनेकांनी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवले आहे. त्यामुळे कामगारांचे कामबंद आंदोलन मिटणार नसल्याचे दिसत आहे.

एसटी महामंडळाच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे 35 दिवसाहून अधिक चाललेल्या संपामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. जरी पगारवाढ केली असली तरी आपले सहकारी गेल्याने यांना मोठे दुःख झाले आहे. त्यामुळे यांनी दुखवटा पाळलेला आहे. तरीपण प्रशासनाने निलंबन, बदल्या या सत्रामुळे यांच्यात खळबळ माजली आहे. पण कर्मचारी यालाही भिक घालत नसल्याने, एसटी प्रशासन हतबल झाले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने नमते घेत, सोमवार 13 डिसेंबरपासून कामावर हजर राहा असे सक्त आदेशच काढले आहेत.

राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात हा संप इतिहासात नोंद घेण्यासारखा ठरला आहे. यापूर्वी 1972 साली हा संप 14 दिवस चालला होता. आत्ता याने विक्रम मोडीत 35 दिवसहून अधिक झालेला आहे.

“वो बुलाते है, मगर जानेका नही”
एवढे दिवस आंदोलन करूनही एसटी महामंडळाकडून योग्य दखल घेत गेली नसल्याने कामगार वर्गात प्रचंड संताप आहे. निलंबन, बदल्या करून सरकारने हे आंदोलन चिरण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यातच आता एसटी महामंडळ महाव्यवस्थापकानी कामगारांना सोमवारपर्यंत हजर व्हा असे आदेश काढले आहेत. कामगार मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. “वो बुलाते है, मगर कॉल उठानेका, १३ तारीख को भी कामावर जानेका नही” असे गाण्याचे स्टेटस् अनेकांनी आपल्या व्हॉट्सॲपवर ठेवले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

2 Comments

  1. सामान्य लोकांचे प्रश्न नाना तुम्ही अगदी परखडपणे मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना मी पाहिले आहे,जवळा घेरडी रस्ता असतील,किवा शेतकऱ्याचे वीज तोडनि,कस्टकरी कामगार,गरी विध्यार्थ्यांना आर्थिक मदत,,झाडे लावा, अशा कितीतरी प्रश्नांना सडेतोड भूमिका मांडल्या,नव्हे त्यासाठी स्वतःची दोन एकर जमीन देऊन झाडे लावून कृतीतून साऱ्या तालुक्याने पाहिली!!तुमच्या लेखणीला,व कार्याला सलाम!!त्रिवार सलाम!!!!–राजू कुलकर्णी घेरडी

  2. सामान्य लोकांचे प्रश्न नाना तुम्ही अगदी परखडपणे मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना मी पाहिले आहे,जवळा घेरडी रस्ता असतील,किवा शेतकऱ्याचे वीज तोडनि,कस्टकरी कामगार,गरी विध्यार्थ्यांना आर्थिक मदत,,झाडे लावा, अशा कितीतरी प्रश्नांना सडेतोड भूमिका मांडल्या,नव्हे त्यासाठी स्वतःची दोन एकर जमीन देऊन झाडे लावून कृतीतून साऱ्या तालुक्याने पाहिली!!तुमच्या लेखणीला,व कार्याला सलाम!!त्रिवार सलाम!!!!–राजू कुलकर्णी घेरडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका