गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

एसटी बस उजनी धरणात पडता पडता वाचली

Spread the love
प्रवाशी सुधीर रणे व वाहक संतोष गायकवाड यांनी बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना बोनेटवर झोपवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. ते थोड्या वेळात शुद्धीवर आले. मात्र, पुन्हा बेशुद्ध झाल्याने  सुधीर रणे   यांनी अँब्युलन्सची वाट न पाहता बस घेऊन भिगवण येथील यशोधरा हॉस्पिटल गाठले . सूर्यवंशी याना वेळीच हॉस्पिटल मध्ये आणल्याने त्यांचेवर उपचार सुरु होऊ शकले.
थिंक टँक : नाना हालंगडे 

वेळ रात्रीच्या साडे दहा ते अकराची.. प्रवासी झोपेत होते.. अचानक बस पुलाच्या सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकली… मोठा आवाज झाला… हार्ट अटॅकने बस चालकाने  स्टेरिंगवर मान टाकली होती.. बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला…तशातही बस पुढे जात होती.. एवढ्यात बसमधील एका युवकाने धाडस करून बसच्या स्टेरिंगचा ताबा घेऊन हँडब्रेकवर बस थांबविली आणि मोठा अनर्थ टळला.

अंगावर शहारे आणणारा थरार घडला सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पळसदेव हद्दीत..
त्याचे झाले असे की, उदगीर डेपोमधून पुण्याकडे बस नंबर (MH 24 AU 8065) निघाली होती… या बसमधून साधारण 40 प्रवाशी प्रवास करत होते… इंदापूर ओलांडून एसटी बस सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग वरून पळसदेव गावाच्या हद्दीत आली.. रात्री अकरा वाजताच्या सुमारास  बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हार्ट अटॅक आला. त्यामुळे बस चालू  असताना स्टिअरिंगवरच ते कोसळले. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी गार्डला धडकली..
हा थरार पाहून बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले… कोणाला काहीच सुचेना.. त्याचवेळी सुधीर रणे या प्रवाशाने प्रसंगावधान राखत स्टिअरिंगचा ताबा घेतला अन् मोठा अपघात टळला. 40 प्रवाशांचे प्राण त्यानं वाचवले.
बस उजनी धरणात पडली असती
जर त्या युवकाने बसचा ताबा घेतला नसता तर बस महामार्गाच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन किंवा उजनी जलाशयाच्या बॅकवॉटरमधील पाण्यात जाऊन पलटी झाली असती.  40 प्रवाशांचे प्राण त्यानं वाचवले.
बस घेऊन हॉस्पिटल गाठले
प्रवाशी सुधीर रणे व वाहक संतोष गायकवाड यांनी बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना बोनेटवर झोपवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. ते थोड्या वेळात शुद्धीवर आले. मात्र, पुन्हा बेशुद्ध झाल्याने  सुधीर रणे   यांनी अँब्युलन्सची वाट न पाहता बस घेऊन भिगवण येथील यशोधरा हॉस्पिटल गाठले . सूर्यवंशी याना वेळीच हॉस्पिटल मध्ये आणल्याने त्यांचेवर उपचार सुरु होऊ शकले.
या घटनेत ४० प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या सुधीर रणे या तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका