गुन्हेगारीताजे अपडेटरोजगार/शिक्षण
Trending

एसटीवरील देवीदेवता होणार गायब

महामंडळाने काढले पत्रक

Spread the love

एसटीवर काळुआई, बाळूमामा, जय मल्हार, करवीर वासिनी, विठुमाऊलीचे किंवा इतर कोणतेही देवीदेवतांचे फोटो आता एसटीवर दिसणार नाहीत.

थिंक टँक / नाना हालंगडे
सर्वसामान्यांची लालपरी अर्थात एसटी बस आता एका वेगळ्या संकटातून मोकळी होणार आहे. हे संकट आहे देवीदेवतांचे. एसटी बसेसवर देवीदेवतांच्या फोटोंनी आक्रमण केल्याने अपघात घडत असल्याचे निदर्शनास आल्याने बसेसवरील देवीदेवतांचे फोटो हटवावेत असे आदेश एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने जारी केले आहेत.

एसटी महामंडळ प्रवासी तिकीटामागे एक रूपया प्रवाशांचा विमा उतरवित असते, त्यामुळे प्रवाशांचा दहा लाखाचा विमा उतरविला जात असतो. एसटीचा हा सुरक्षित प्रवास आणखीनच सुरक्षित करण्यासाठी एसटीच्या काचांवर देवी देवतांचे स्टीकर किंवा फोटो, अथवा नाव दिल्याने ड्रायव्हर समोरील दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळु शकते.

एसटी महामंडळाच्या बसेसच्या काचांवर देवी आणि देवतांचे फोटो किंवा स्टीकर श्रद्धेपोटी लावले जात असल्याचे उघडकीस आले आहे. हे फोटो लावण्याने ड्रायव्हरला रस्त्यावरील वाहने दिसण्यास अडथळा येऊन अपघाताला निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे एसटी महामंडळाने परिपत्रक काढत अशाप्रकारे एसटीच्या कांचावर कोणत्याही प्रकारची स्टीकर चिकटवू नये असे आदेशच काढले आहेत. एसटी महामंडळाच्या  नागपूर विभागाला अशा प्रकारचे परिपत्रक लिहून एसटी काचा स्वच्छ असाव्यात असे म्हटले आहे. हे परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाने एसटी बस आणि एसटी स्थानक परीसर स्वच्छ मोहिम सुरू केली असून त्याच योजनेचा हा एक भाग असल्याचे म्हटले जाते. एसटीला ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटले जात असून या सार्वजनिक परीवहन सेवेचा अपघाताचा दर इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. दर एक लाख किलोमीटरला एसटी चालकाच्या अपघाताचे प्रमाण 0.17 टक्के इतके कमी आहे. समोरच्या वाहनाची चुकीचे प्रमाण 90 टक्के इतके आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास इतर खाजगी वाहनांच्या तुलनेत खूपच सुरक्षित मानला जात असतो.

एसटी महामंडळ प्रवासी तिकीटामागे एक रूपया प्रवाशांचा विमा उतरवित असते, त्यामुळे प्रवाशांचा दहा लाखाचा विमा उतरविला जात असतो. एसटीचा हा सुरक्षित प्रवास आणखीनच सुरक्षित करण्यासाठी एसटीच्या काचांवर देवी देवतांचे स्टीकर किंवा फोटो, अथवा नाव दिल्याने ड्रायव्हर समोरील दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळु शकते.

एसटीवर काळुआई, बाळूमामा, जय मल्हार, करवीर वासिनी, विठुमाऊलीचे किंवा इतर कोणतेही देवीदेवतांचे फोटो लावू नयेत ज्यामुळे चालकाची दृश्यमानता कमी होईल असे पत्र महामंडळाचे महाव्यवस्थापक (यंत्र अभियंता) नं.शि.कोलारकर यांनी नागपूर विभागाला लिहिले आहे. ते समाजमाध्यमावर चांगलेच व्हायरल होत आहे.

या निर्णयामुळे एसटी बसेस आता मोकळा श्वास घेणार आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका