एड्सचा विषाणू वानरांमधून माणसांत आला
आज जागतिक एड्स दिन, वाचा थक्क करणारी गुपिते
- पुरोगामी युवक संघटना पुरोगामी विचारांची पोकळी भरून काढेल : डॉ. बाबासाहेब देशमुख
- आता ‘काडी लावणे’ही महागले
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स (AIDS – Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने (UNO) घोषित केले आहे.
ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांची संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला.
‘सायन्स जनरल’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखानुसार एड्सची उत्पत्ती ही किन्शासा शहरात झाली आहे. हे शहर आता कॉन्गो गणराज्याच्या नावाने ओळखले जाते. त्या लेखानुसार, शास्त्रज्ञांनी एड्सच्या विषाणूच्या जेनेटीक कोडच्या नमून्यांचं संशोधन केलं आहे. या संशोधनात हे विषाणू किन्शासा शहरात निर्माण झाल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे एड्सची निर्मिती झाल्यानंतर ३० वर्षांनी या रोगाची माहिती झाली.
तसेच ह्य़ूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे एड्स विषाणूशी संबंधित असलेले लेंटिव्हायरसेस (सतत रचना बदलणारे विषाणू) हे आफ्रिकेतील नर वानरांमध्ये १.६० कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते असेही नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे.
अमेरिकेतील बोस्टन महाविद्यालयाचे वेलकिन जॉन्सन व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतर्गत रचना सतत बदलणाऱ्या लेंटिव्हायरसेस (रेट्रोव्हायरसेसचा एक प्रकार) या विषाणूंचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑक्सफर्ड आणि बेल्जियम विद्यापीठाच्या लूवेन विद्यापीठाच्या संशोधन चमूने एड्सच्या फॅमिली ट्रीची पुनर्रसंरचना करण्याचा प्रयत्न केला. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार HIVचा हा चिंपांजीचा वायरसचं परिवर्तित रूप आहे. हा सिमियन इम्युनोडिफिसिएंसी वायरसच्या नावाने ओळखला जातो. किन्शासा शहर हे बुशमीटची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे संक्रमित झालेल्या रक्तामुळे हा वायरस मनुष्याच्य़ा शरीरात आला असण्याची शक्यता आहे. हा वायरस विविध माध्यमातून पसरला आहे.
या वायरसने चिंपांजी, गोरिल्ला आणि शेवटी माणासाच्या शरिरात प्रवेश केला. दरम्यान HIV-१ ने कॅमरून शहरातील लाखो लोकांना संक्रमित केलं. त्यानंतर हा वायरस जगभरात पसरला.
असं का घडलं हे याच्या मुळाशी जायचं असेल तर काही दशकं मागे पाहावे लागेल. १९२० पर्यंत किन्शासा शहर हे बेल्जियम कॉन्गोचा भाग होता. १९६६ सालापर्यंत त्याला लियोपोल्डविले नावाने ओळखले जात होतं. हे शहर बरेच मोठे होते आणि याची वाढ वेगात होत होती. त्यावेळी वेगवेगळ्या यौनसंबंधांचे आजार मोठ्या वेगात वाढत होते. त्याच काळात किन्शासा शहरात एका स्त्रीच्या मागे दोन पुरूष अशी संख्या झाली. त्यामुळे वेश्याव्यवसाय वाढला. या काळात दोन्ही प्रकारचे वायरसमुळे वेगाने वाढत राहिले.
आरोग्य शिबिरात वापरल्या गेलेल्या सुईमुळे हा वायरस वाढण्यास मदत झाली. तसंच HIV वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे रेल्वे जाळं. १९४० च्या शेवटात जवळपास १० लाख लोक किन्शासा शहरात ये-जा करत होते. त्यामुळे हा प्रकार आणखी वाढला.
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये १९८१च्या सुमारास अचानक एका विकाराने लोकांना झपाटल्यागत अवस्था झाली. समलिंगी पुरुषांच्या गूढ आजारामुळे होत असलेल्या मृत्यूच्या घटनांनी ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी अमेरिकेत दहशत निर्माण केली होती.
या लोकांची रोगप्रतिकारशक्ती लोप पावलेली होती आणि त्यामुळे इतरही रोग त्यांना झालेले आढळले. या विकाराने ग्रस्त झालेल्या मंडळींचा मृत्यूही वेगात होतो आहे, हे लक्षात आले. मात्र इतरत्र कुठेही होते तसेच अमेरिकेतही झाले. सरकारने हे प्रकरण काही फारसे गांभीर्याने घेतलेले नव्हते. सरकार तर त्या विषयी बोलणेही टाळत होते. त्याच सुमारास लुक माँटानिये (फ्रान्स) आणि रॉबर्ट गॅलो (अमेरिका) या दोन शास्त्रज्ञांनी १९८३-८४ मध्ये मानवी शरीर पोखरून काढणार्या ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरसचा स्वतंत्रपणे शोध लावला.
समलिंगींचा आजार अशी ओळख बनलेल्या या व्हायरसने कुणाला कळायच्या आतच अमेरिका आणि आफ्रिका खंडात थैमान घालायला सुरुवात केली. अमेरिकेत त्याचे ‘गे प्लेग’ असे वर्णन केले गेले. १९८६ नंतर भारतात शरीरविक्रय करणारया महिलांचा रोग म्हणून एड्सची लोकांना ओळख झाली. १९८७ उजाडे पर्यंत तब्बल ४० हजार अमेरिकन नागरिक HIV एड्सला बळी पडले होते. द. आफ्रिकेच्या त्या वेळच्या परराष्ट्रमंत्र्याने ‘द टेररिस्ट्स आर नाउ कमिंग टू अस वुइथ अ वेपन मोअर टेरिबल दॅन मार्क्सिझम : एड्स’ असा इशारा दिला.
वर्ष होतं १९८६, जेव्हा चेन्नईच्या वेश्यावस्तीत भारतातल्या पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं. पाठोपाठ अनेक मोठय़ा शहरातून, जिथे जिथे एड्सच्या तपासण्यांची सुविधा होती अशा ठिकाणी रुग्ण सापडू लागले आणि एड्स नावाचा भस्मासुर देशात उत्पन्न झाल्याची बातमी सर्वदूर पसरली. एकीकडे असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त संक्रमण, मातेकडून गर्भाला किंवा स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमण, शिरेतून नशा आणणाऱ्या औषधांचा वापर या सर्व गोष्टींतून HIV विषाणूंचा प्रसार आणि एड्सची लागण वाढतच चाललेली होती.
कोणत्याही व्यक्तीची रोगप्रतिबंधक शक्ती त्याच्या सीडीफोर (CD-४) लिम्फोसाइट या रक्तपेशीच्या संख्येवरून मोजली जाते. HIVचा विषाणू या ‘सीडीफोर लिम्फोसाइट’ वरच हल्ला करत असल्यानं रुग्ण आपली प्रतिकारक शक्ती गमावून बसतो आणि कोणत्याही इतर जंतुसंसर्गाला चटकन बळी पडतो. या विषाणूंची शरीरात झपाट्याने वाढ होऊन शरीरातील प्रतिकार करणाऱ्या पेशींचे प्रमाण म्हणजे सीडी ४ काऊंटचे प्रमाण २०० च्या खाली गेले असता या रुग्णांमध्ये निरनिराळे रोग उद्भवतात.
कारण त्यांची सर्वसाधारण जंतू आणि विषाणूंचीही प्रतिकार करण्याची शक्ती मंदावलेली असते. अशात क्षयरोग, नागीण, बुरशी अशा प्रकारचे विषाणू हल्ला करतात. रुग्णाचा मृत्यू या ‘संधिसाधू’ जंतूंच्या संसर्गामुळेही होत असतो. अशा संसर्गात सर्वात अग्रणी आहेत ते क्षयरोगाचे जंतू.
आफ्रिकेत समलिंगींना दगडांनी ठेचून मारण्यात येऊ लागले, तर भारतात HIVसह जगणार्या शाळकरी मुलांना जिवंत जाळण्यापर्यंत मजल गेली. समाजात भीतीचे, दहशतीचे वातावरण पसरले. नातेवाइक सोडाच; पण डॉक्टरही पॉझिटिव्ह व्यक्तींना झिडकारू लागले. मृतदेहांची विटंबना होऊ लागली. त्याच सुमारास अमेरिकेत हॉलिवूड अभिनेता रॉक हडसन (१९८५), बास्केटबॉलपटू मायकल ‘मॅजिक’ जॉन्सन (१९९१) आदींनी निर्धाराने आपले एड्स स्टेटस जाहीर केले.
संयुक्त राष्ट्रसंघाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यूएनएड्सची स्थापना (१९९६) केली. बिल आणि मेलिंदा या गेट्स दाम्पत्याने रोगाची व्याप्ती ओळखून पुनर्वसन आणि संशोधनासाठी आपल्या कमाईतला मोठा हिस्सा जाहीर केला. त्यापाठोपाठ बिल क्लिंटन, रिचर्ड गेर, नेल्सन मंडेला आदींनी एड्स विरोधी मोहिमेत आपला सहभाग नोंदवल्याने विचार आणि कृतीची दिशा बदलून टाकणाऱ्या वैश्विक बांधिलकीच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
महाभयंकर रोग असलेल्या AIDS आणि HIV संसर्गाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. यासाठीच १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो. गेल्या काही वर्षां पासून मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने HIVची लागण होण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. तरी देखील अद्याप धोका कायम आहे.
*संदर्भ : इंटरनेट