आरोग्यगुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमनोरंजनमाध्यमविश्वराजकारणरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी
Trending

एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी द्या; रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale RPI

Spread the love

मुंबई : थिंक टँक न्यूज नेटवर्क
नव्या शिंदे-फडवीस सरकारमध्ये रिपाइं पक्षाला एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची एक जागा द्यावी अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

मंत्रीपदावरुन अनेक जण नाराज आहेत तर अनेक जण अजूनही मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अशातचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील मंत्री पदाची मागणी केली. त्यांच्या या नव्या मागणीमुळे सरकारची कोंडी होणार आहे. मित्रपक्ष असल्यामुळे आरपीआय मंत्रीपदाची मागणी केली आहे. यापूर्वीसुद्धा रामदास आठवले यांनी मागणी केलेली होती. एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी मिळाली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली.

शिंदे-फडवीस सरकारमध्ये मंत्रीपदावरुन अनेक जण नाराज आहेत तर अनेक जण अजूनही मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अशातचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी देखील मंत्री पदाची मागणी केली आहे. मित्रपक्ष असल्यामुळे आरपीआय मंत्रीपदाची मागणी केली आहे. यापूर्वीसुद्धा रामदास आठवले यांनी मागणी केलेली होती. एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी मिळाली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केलीय. तसेच सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केलेय.

रामदास आठवले यांनी विधीमंडळात फेरफटका मारला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांनाच मिळेल असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केला. विरोधक म्हणतात शिंदे-फडणवीस सरकार पाडा म्हणून ते करतात राडा अशी शीघ्र कविता देखील रामदास आठवलेंनी सादर केली.

पाहा खास व्हिडिओ

https://youtu.be/SnOtekdcjyI

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका