सांगोला/ नाना हालंगडे
‘एक तेरे बिना इस दुनिया की
हर चीज अधुरी लगती है!’
या हिंदी गाण्यावर बनवलेला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला व तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात गाजतो आहे.
जीवनात परिस्थिती कशीही असो, क्षेत्र कोणतेही असो परंतु ते आनंदाने जगता आले पाहिजे. आनंदाने जगण्यासाठी परिस्थिती कधीही आड येत नाही. आनंददायी जगण्याची प्रेरणा देणारा असाच एक ऊसतोड मजुर महिलेच्या व्हिडिओवर नेेटकऱ्यांचा कमेंट आणि मेसेजचा चांगलाच पाऊस पडतोय.
बैलगाडीमधून कारखान्याकडे ऊसतोड करून घेऊन जाताना हिंदी गाण्यावरील असणारा व्हिडिओ सध्या सर्वत्र गाजतोय. सामान्यांपासून अधिकारी वर्ग व उच्चभ्रू लोकही आपला स्टेटस म्हणून हा व्हिडिओ ठेवून सुंदर जीवनाच्या चार ओळीचे डोसही पाजले जात आहेत.
ऊसतोड करून तो बैलगाडीमधून कारखान्याकडे घेऊन जात असतानाच बैलगाडीवरील उसाच्या मोळीवर बसलेल्या त्या महिलेने
‘एक तेरे बिना इस दुनिया की
हर चीज अधुरी लगती है!’
या हिंदी गाण्यावर बनवलेला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला व तो व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात गाजतो आहे. हा व्हिडिओ सर्वसामान्यांपासून तरुण, प्रशासनातील अधिकारी, डॉक्टर, नेतेमंडळी असे सर्व क्षेत्रातील मान्यवर आपला आपला स्टेटस ठेवताना दिसून येत आहेत. या व्हिडिओखाली जीवन कसे सुंदर आहे, आपण कसे जगले पाहिजे याबाबतच्या दोन-चार वाक्य लिहून उपदेशाचे डोसही पाजण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.
सध्या हा व्हिडिओ हॉटेलमधून, कॉलेजच्या परिसरात व विशेषता सरकारी ऑफिसमधूनही या गाण्याची धून ऐकू येत आहे. यावर ऊसतोड मजूर असतानाही सोशल मीडियावर महिलेने तयार केलेला व्हिडिओवर ऊसतोड मजूर असतानाही महिलेने सोशल मीडियावर तयार केलेला व्हिडिओ, प्रत्येकाची परिस्थिती, आनंददायी जीवन यावर चर्चाही केलेली दिसून येत आहे.
“जीवन खूप सुंदर आहे पण ते चांगल्या रीतीने जगता आले पाहिजे. या जीवनात सर्वांनाच सुख-दुःख भेटते. जीवनात दुःख आले म्हणून खचून न जाता ते आनंदाने जगले पाहिजे अशीच प्रेरणा या व्हिडिओवरून मिळते” – आकाश लिगाडे, विशेष कार्य अधिकारी, उपाध्यक्ष विधानसभा, महाराष्ट्र राज्य
“जीवन आनंदाने जगण्यासाठी माणसाची परिस्थिती कधीच आड येत नाही. परिस्थिती कितीही चांगली व हलाखीचे असली तरी त्यातून आपण आनंद शोधून जीवन जगले पाहिजे. ऊसतोड करून जगणारी ही महिला आनंदाने जगते” – अभिजीत दौंडे, व्यवस्थापक, दौंडे मंडप, सांगोला
उपदेशाचे डोस नको, आनंददायी आचरण हवे
जीवन एक गीत आहे ते गात जावे,
जीवन एक संगीत आहे ते ऐकत जावे,
जीवन खूप सुंदर आहे,
ते आनंदाने भरभरून जगावे..
या कवितेप्रमाणे प्रत्येकाने प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगले पाहिजे. परंतु आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक क्षेत्रातील उपदेशाचे फक्त डोस पाजले जातात. परंतु त्याप्रमाणे आचरण करीत नाहीत. उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा जीवनात प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीत आनंद शोधला पाहिजे, असा सल्ला अनेकांनी दिला आहे.
हेही वाचा
शेकापच्या ४५ सरपंचांचा शहाजीबापूंवर संताप, कामात खोडा घालत असल्याचा आरोप
विद्यार्थीसंख्या वाढली; पण गुणवत्ता ढासळली, ‘असर’ सर्वेक्षणातून पुढे आले सत्य