उद्या गावोगावी जलजीवन मिशनविषयी विशेष ग्रामसभा
वाचा नेमका काय होणार गावांना फायदा
थिंक टँक / नाना हालंगडे
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना मार्च २०२४ अखेरपर्यंत हर घर नल से जल म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी २६ जानेवारी २०२३ रोजीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जल जीवन मिशनविषयी सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून सन २०१९ पासून जल जीवन मिशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. सदर अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह, पुरेसे प्रतिदिनी व प्रतिमाणसी ५५ लिटर प्रमाणे नियमित स्वरुपात पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. अद्यापपर्यत जिल्हयात सर्व ११ तालुक्यात एकुण ५ लाख ७० हजार ३० या उद्दिष्टामधील आजपर्यंत ४ लाख ९४ हजार १६८ इतके म्हणजे ८६.८९ इतके नळ जोडणीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. मार्च २०२४ अखेर पर्यंत संपुर्ण जिल्हा हा हर घर नल से जल म्हणून घोषित करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे.
हर घर जल से नल या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये व्यापक स्वरुपात प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देऊन व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थित ग्रामस्थांना अवगत करण्यात येणार आहे.
पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या ५ महिलांना सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात येणार आहे. जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढीस लागून पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल. ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संच (एफ.टी.के) च्या माध्यमातून महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे ग्रामसभेमध्ये देण्यात येणार आहे.
क्षेत्रिय तपासणी संचाचे मदतीने, पाणी गुणवत्ता तपासणी अनुषंगाने ५ महिलांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करण्यात यावे.या ग्रामसभेदरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजुर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती इ.तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत गावातील पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा १० टक्के लोकवर्गणीची रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्यावाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा १० टक्के लोकवर्गणी जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना करण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केले आहे.
हेही वाचा
शेकापच्या ४५ सरपंचांचा शहाजीबापूंवर संताप, कामात खोडा घालत असल्याचा आरोप