सोलापूर : विशेष प्रतिनिधी
लहान मुलं ही उद्याची भावी पिढी असतात. ही लेकरं सदृढ, निरोगी बनली तरच भविष्यातील पिढीचे आरोग्य निकोप राहते. त्यामुळे एकूण वैद्यकीय क्षेत्रात बालरुग्ण सेवेला अत्यंत महत्त्व असते आणि हेच कार्य सोलापुरातील “सौ. जनाई मेमोरियल संचलित आशिष क्लिनिक” अव्याहतपणे करीत आहे. या रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत.
सोलापुरातील नामवंत बालरोग तज्ज्ञ डॉ. दयानंद नकाते यांनी जुनी फौजदार चावडी परिसरात “सौ. जनाई मेमोरियल संचलित आशिष क्लिनिक” हे बाल रुग्णालय सुरू केले. पाहता पाहता या रुग्णालयाची ख्याती केवळ सोलापूर शहर, जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातही पसरली. अगदी कर्नाटकातूनही अनेक बालरुग्ण येथे उपचारासाठी दाखल होत असतात.
पाहा व्हिडिओ
डॉ. दयानंद नकाते यांच्यासह डॉ. एस.पी. नकाते, डॉ. सौ. एन.डी. नकाते यांच्या अविरत रुग्णसेवेतून हा रुग्णालयाने रुग्णांचे पालक आणि नातेवाईकांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
- उपलब्ध सुविधा
या रुग्णालयात खालील सुविधा उपलब्ध आहेत. - नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU)
- बालरोग अतिदक्षता विभाग (PICU)
- कृत्रिम श्वासोच्वासाचे अद्यावत मशिन्स
- सेंट्रल ऑक्सिजन, मल्टीपॅरा मॉनिटर
- पल्सऑक्स, सिरीज पम्पस
- नेब्युलायझर
- बेशुद्ध आणि झटके येणाऱ्या मुलांसाठी सर्व उपकरणांची विशेष सोय
- एक्स रे व लॅबोटरीची सुविधा
- लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियेची सोय,
- Pediatric Surgery साठी अत्याधुनिक मशिन्सने
- सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर
- स्पेशल व डिलक्स रूम
- जनरल वॉर्ड
- २४ तास तातडीची सेवा उपलब्ध
- गरम पाण्याची सोय